Join us

सनी देओलच्या 'गदर 2' साठी २२ वर्ष जुना 'गदर' रि-रिलीज, प्रमोशनचा हा फंडा आला कामी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 4:01 PM

2001 साली रिलीज झालेला 'गदर एक प्रेम कथा' ९ जून रोजी रि-रिलीज करण्यात आला.

सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) यांचा सिनेमा 'गदर 2' (Gadar 2)  ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'गदर 2' ची चर्चा होत असतानाच मेकर्सने 2001 साली आलेला 'गदर' हा सिनेमा थिएटर्समध्ये री-रिलीज केला. ही खरंतर मेकर्सची स्ट्रॅटेजीच होती जी यशस्वी ठरली. चाहत्यांच्या मनात पुन्हा 'गदर' च्या आठवणी जाग्या झाल्या. याचा फायदा 'गदर 2' ला होणार हे नक्की. 

2001 साली रिलीज झालेला 'गदर एक प्रेम कथा' ९ जून रोजी रि-रिलीज करण्यात आला. त्याचे ग्राफिक्स अपडेट केले गेले. आश्चर्य म्हणजे 'गदर' पुन्हा थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी उसळली. म्हणजेच मेकर्सचा हा फंडा कामी आला आहे. 'गदर 2' हिट होणार अशी आशा मेकर्सला वाटत आहे. 

'गदर 2' मध्ये तारा सिंगची सून होणार 'ही' अभिनेत्री, इंटिमेट सीन्समुळे आली होती चर्चेत

वीकएंडला वाढले कलेक्शन 

'गदर एक प्रेम कथा' ९ जून रोजी देशभरात रि-रिलीज करण्यात आला असून सिनेमाने ५ दिवसात समाधानकारक बिझनेस केला.९ जून रोजी ओपनिंग डे लाच सिनेमाने ३० लाखांच्या कमाईने सुरुवात केली. तर दुसऱ्या दिवशी ४५ लाख आणि तिसऱ्या दिवशी ५५ लाखांची कमाई केली. अशा प्रकारे पहिल्या आठवड्यातच सिनेमाने 1.30 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. सोमवारी पहिल्याच वर्किंग डेलाही सिनेमाने ३० लाखांचा गल्ला जमवला. तर मंगळवारी कलेक्शनमध्ये घसरण बघायला मिळाली. 

तारा सिंग आणि सकीनाची प्रेमकहाणी आता पुन्हा ११ ऑगस्ट रोजी पडद्यावर येत आहे. यामध्ये त्यांचा मुलगा चीते सुद्धा मोठा झाला असून 'गदर २'ची कहाणी त्याच्याभोवती असेल अशी शक्यता आहे. चीतेची भूमिका अभिनेता उत्कर्ष शर्माने साकारली आहे. 

टॅग्स :सनी देओलबॉलिवूडअमिषा पटेल