अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) 'गदर 2' सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा करत बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. तर आता त्याचा मुलगा राजवीर देओलने 'दोनो' या सिनेमातून पदार्पण केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघंही सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुलाखती देत होते. दरम्यान सनी देओलने नेपोटिझमवर आपलं मत मांडलं. आपल्या मुलाचा विचार वडील नाही करणार तर कोण करणार? असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
एका मुलाखतीत सनी देओल म्हणाला,"नेपोटिझमचा काय अर्थ आहे असा आधी मी विचार करायचो. जेव्हा समजलं तेव्हा वाटलं की एक वडील आपल्या मुलाचा विचार नाही करणार तर कोण करणार? अभिनयाचं क्षेत्र असो किंवा कोणतंही असो, प्रत्येक पिता आपल्या मुलाच्या सुखी जीवनासाठी झटतो. नेपोटिझम या शब्दाचा वापर ते लोक करतात ज्यांना काही कारणाने आयुष्यात यश मिळालेलं नाही. ते आपली निराशा दाखवण्यासाठी या शब्दाचा वापर करतात. जेव्हा की नेपोटिझम या शब्दाचा काहीच अर्थ नाही."
आपल्या कुटुंबाविषयी सांगताना तो म्हणाला, 'माझ्या वडिलांनी स्वत: त्यांची ओळख बनवली आहे. मला माहित आहे की वडील होण्याचा काय अर्थ असतो आणि त्यांचं दु:खही मी समजू शकतो. पण राजवीरचा प्रवास हा त्याचा एकट्याचा आहे.'
सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलने 'पल पल दिल के पास' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता छोटा मुलगा राजवीर अभिनय क्षेत्रात आला आहे. तर सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीशने 'दोनो' या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आह.