Join us

रवीना टंडनच्या डोळ्यातील पाणी पाहून संतापला होता सनी देओल, अक्षय कुमारसोबत घेतला होता पंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 18:33 IST

Sunny Deol And Akshay Kumar : 'जिद्दी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रवीना टंडनमुळे सनी देओल आणि अक्षय कुमार यांच्यात वाद झाले होते.

सिनेइंडस्ट्रीत अनेकदा कलाकारांमध्ये मैत्रीचे नाते पाहायला मिळते तर कधी नाते बिघडतानाही दिसते. अनेकदा कलाकारांची नावे एकमेकांशी जोडली जात असतात. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे नाव मागे कसे राहणार? एकेकाळी अक्षय कुमारचे प्रेमप्रकरण बी-टाऊनच्या कॉरिडॉरमध्ये खूप गाजले होते.

अक्षय कुमार एक असा स्टार आहे ज्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. ट्विंकल खन्नाच्या आधी खिलाडी कुमारने शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडनलाही डेट केले होते. शिल्पा शेट्टीसाठी अक्षयने रवीनासोबत ब्रेकअप केल्याचे बोलले जात आहे. अक्षय आणि रवीनाच्या लग्नाच्या बातम्याही मीडियात येऊ लागल्या होत्या. मात्र अचानक अक्षयच्या आयुष्यात शिल्पाची एन्ट्री झाली आणि अक्षयने रवीनासोबतचे नाते संपवले.

रवीनामुळे अक्षय कुमार आणि सनी देओलमध्ये झाली होती बाचाबाची अक्षयने दगा दिल्यामुळे रवीना उद्ध्वस्त झाली होती. हा प्रकार १९९७ मध्ये घडला, जेव्हा 'जिद्दी' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. या चित्रपटात रवीना आणि सनी देओल मुख्य भूमिकेत होते. शूटिंगदरम्यान त्यांची मैत्री घट्ट झाली. अशा परिस्थितीत रवीना अनेकदा सनी समोर रडायची. रवीनाच्या दुःखाचे कारण सनी देओलला कळल्यावर तो अक्षय कुमारवर चांगलाच चिडला. या मुद्द्यावरून सनी अक्षय कुमारमध्ये बाचाबाची झाली होती. असे सांगितले जाते की, दोघेही बराच काळ एकमेकांशी बोलत नव्हते.

टॅग्स :अक्षय कुमाररवीना टंडनसनी देओल