Join us

​‘या’ हिरोईनसोबत डेब्यू करणार सनी देओलचा ‘गदर’ मुलगा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2018 6:44 AM

‘गदर- एक प्रेमकथा’  आणि ‘अपने’ यासारखे सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित करणारे अनिल शर्मा यांनी आता एक नवी तयारी चालवली आहे.ती ...

‘गदर- एक प्रेमकथा’  आणि ‘अपने’ यासारखे सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित करणारे अनिल शर्मा यांनी आता एक नवी तयारी चालवली आहे.ती म्हणजे, आपल्या मुलाला लॉन्च करण्याची.  अनिल शर्मा लवकरच ‘जीनिअस’ हा चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटातून अनिल शर्मा आपला मुलगा उत्कर्ष याला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत. केवळ उत्कर्षचं नाही तर उत्कर्षच्या अपोझिट एक नवी हिरोईनही अनिल शर्मा लॉन्च करणार आहेत. या हिरोईनचे नाव आहे इशिता. अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर इशिताच्या लॉन्चची घोषणा केली. इशिताचा फोटो शेअर करत, ‘जीनिअसमध्ये उत्कर्षसोबत इशिता दिसणार,’ असे त्यांनी लिहिले. २००१ मध्ये ‘गदर - एक प्रेमकथा’ या चित्रपटात उत्कर्ष बालकलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.  अनिल शर्माच्या या चित्रपटात आयशा जुल्का, मिथुन चक्रवर्ती, नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.  स्लिप डिस्कच्या समस्येचा सामना करणारी आयशा जुल्का सुमारे सात वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ‘जीनिअस’ हा एक सायन्स फिक्शन आहे. एक तरूण आपल्या प्रयोगाने जग बदलतो, असे कथानक यात दिसणार आहे. अलीकडे ‘जीनिअस’चे फर्स्ट शूटींग शेड्यूल संपले. मॉरिशस येथे फर्स्ट शेड्यूल पूर्ण केल्यानंतर ‘जीनिअस’चे संपूर्ण युनिट मुंबईत पुढील शेड्यूल शूट करणार आहे. अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाला आज १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ जून २००१ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी तब्बल ७७ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाच्या लाइफ टाइम कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास या चित्रपटाने तब्बल ४०० कोटी रुपयांची कमाई केली होती.