‘बेबी डॉल’ सनी लिओनीला मिळाला आणखी एक साऊथचा सिनेमा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 06:00 IST
आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री सनी लिओनी आता साऊथ सिनेमांकडे वळली आहे. होय, सनी लवकरच एका तामिळ चित्रपटात लीड रोलमध्ये दिसेल.
‘बेबी डॉल’ सनी लिओनीला मिळाला आणखी एक साऊथचा सिनेमा!
ठळक मुद्देया चित्रपटात सनीला साऊथ मेगास्टार ममूटीच्या अपोझिट साईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मल्याळम, कन्नड, तेलगू शिवाय हिंदीही रिलीज होणार आहे.
आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री सनी लिओनी आता साऊथ सिनेमांकडे वळली आहे. होय, सनी लवकरच एका तामिळ चित्रपटात लीड रोलमध्ये दिसेल. या चित्रपटात सनीला साऊथ मेगास्टार ममूटीच्या अपोझिट साईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मल्याळम, कन्नड, तेलगू शिवाय हिंदीही रिलीज होणार आहे. सनीच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे, ‘मधुरा राजा’.
सनी व ममूटी यांच्याशिवाय सुकुमराना, अतुल कुलकर्णी,पृथ्वीराज व शमा कासीम असे अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसणार आहे. अलीकडे सनी साऊथचा चित्रपट ‘वीरमादेवी’त दिसली होती. या चित्रपटातील सनीची भूमिका साऊथच्या प्रेक्षकांना भावली. याचमुळे ‘मधुरा राजा’ सनीच्या झोळीत पडला. अद्याप या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. पण लवकरच ती होईल, असे कळतेय.
इमेज बदलण्यासाठी आपण साउथ इंडस्ट्रीत जाणार असल्याचे सनी मध्यंतरी म्हणाली होती. त्यामुळे सनी लिओनीला पोर्न स्टार इमेज असल्याचा पश्चात्ताप होत असल्याची चर्चा लोकांमध्ये रंगली होती. परंतु ही चर्चा सनीने फेटाळून लावली होती. पॉर्न स्टार या इमेजचा मला अजिबात पश्चाताप नाही, उलट मला याबद्दल स्वत:चा अभिमानचं जास्त वाटतो, असे सनी म्हणाली होती.
सनी रिआॅलिटी शो ‘बिग बॉस 5’मध्ये सहभागी झाली होती. याच शोदरम्यान म्हणजेच ‘बिग बॉस 5’च्याच घरात महेश भट्ट यांनी सनीला ‘जिस्म2’ची आॅफर दिली होती. पुढे तिला एकता कपूरचा ‘रागिनी एमएमएस2’ही मिळाला. यानंतर शाहरूख खानसोबत स्क्रिन शेअर करण्यापासून अनेक बिग बॅनरच्या चित्रपटात आयटम साँग करताना ती दिसली. सनी लिओनी भारतात सर्वाधिक सर्च केल्या जाणा-या सेलिब्रेटींपैकी एक आहे.