सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज होतो ना होतो, तोच यावरून वाद सुरू झाला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (एसजीपीसी) प्रवक्ता दिलजीत सिंह बेदी यांनी सनीच्या बायोपिकच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे. या शीर्षकातील करणजीत कौर नावावर त्यांचा प्रमुख आक्षेप आहे.या बायोपिकचे नाव ‘करणजीत कौर’ ठेवणे शिखांच्या भावानांशी खेळण्याचा प्रकार आहे. धर्म बदलेल्या सनीला ‘कौर’ शब्द वापरण्याचा काहीही हक्क नाही, असे दिलजीत सिंह यांनी म्हटले आहे. अद्याप सनी वा या बायोपिकच्या मेकर्सकडून याबाबत कुठलाही खुलासा आलेला नाही. पण एसजीपीसीने यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याच्या हालचाली चालवल्या आहेत.सनीचे ‘करणजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लिओनी’ हे बायोपिक प्रत्यक्षात एक वेबसीरिज आहे. अलीकडे याचा ट्रेलर रिलीज झाला होता. सनी लिओनी स्वत: यात स्वत:ची भूमिका साकारताना दिसणार आहे. आदित्य दत्त दिग्दर्शित करत असलेल्या या बायोपिकमध्ये १४ वर्षीय रसा सौजनी सनीच्या बालपणीची भूमिका वठवणार आहे.
सनी रिऑलिटी शो 'बिग बॉस 5'मध्ये सहभागी झाली होती. याशोनंतर तिच्या बॉलिवूड प्रवासाची दारं उघडी झाली. याच घरात महेश भट्ट यांनी सनीला ‘जिस्म2’ची आॅफर दिली होती. पुढे तिला एकता कपूरचा ‘रागिनी एमएमएस2’ही मिळाला. यानंतर शाहरूख खानसोबत स्क्रिन शेअर करण्यापासून अनेक बिग बॅनरच्या चित्रपटात आयटम साँग करताना ती दिसली.
सनी लिओनी भारतात सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींपैकी एक आहे. सनी वीरमादेवी या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. या सिनेमात ती वीरमादेवीची मुख्य भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. वीरमादेवी एक यौद्धा राजकुमारी असणार आहे.