सनी लिओनीच्या बायोपिक वेब सीरिजची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. यात सनीने स्वत:चं स्वत:ची भूमिका साकारलीयं. लोकांच्या पसंतीत उतरलेल्या या वेब सीरिजच्या माध्यमातून सनीच्या चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. पण या बायोपिक वेब सीरिजने अनेक वादही ओढवून घेतले. अर्थात सनीला याची पर्वा नाही. अलीकडे मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत सनी यावर भरभरून बोलली. या बायोपिकमध्ये तू स्वत:चं स्वत:ची भूमिका साकारण्याचा निर्णय का घेतलास? असा प्रश्न सनीला केला गेला. यावर सनीने अगदी मनमोकळे उत्तर दिले. नमह फिल्म्स आणि माझा पती डेनियल वेबर माझ्याकडे ही कल्पना घेऊन आलेत. पण माझे पूर्वानुभव बघता, माझे आयुष्य जगापुढे आणण्यास मला फार रस उरलेला नव्हता. पण बऱ्याच विचारांची मी ही वेब सीरिज करण्याचा निर्णय घेतला़, असे तिने सांगितले.
स्वत:ची जनमानसातील प्रतिमा सुधारण्यासाठी तू ही वेबसीरिज केली का, यावर तिने नकारार्थी उत्तर दिले. माझ्याबद्दल लोक काय काय विचार करतात, मला ठाऊक नाही. जे खरे आहे, तेच मी जगापुढे आणले. माझ्या आयुष्याचे वास्तव या वेब सीरिजमध्ये आहे, असे ती म्हणाली. आपले जुने आयुष्य पुन्हा जगण्याचा अनुभव कसा होता, असे विचारले असता सनी भावूक झाली. या वेवसीरिजच्या माध्यमातून पुन्हा भूतकाळात परत जाण्याचा निर्णय माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी होता. शूट करत असताना माझी काय अवस्था होती, ते मी सांगू शकत नाही. दुसºयाच सीनने मी अंर्तबाह्य हादरून गेले होते. अजूनही मला त्यातून सावरता आलेले नाही. अनेकदा सीन देता देता माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागायचे. मला माझी कहाणी माहितीये. मी आयुष्यात घेतलेले निर्णय मला ठाऊक आहेत. तेव्हा ते निर्णय घेण्याइतपत मी प्रगल्भ नव्हते. त्या निर्णयाचा माझ्या कुटुंबावर, नातेवाईकांवर काय परिणाम होईल, हेही मला कळत नव्हते, असे सनीने सांगितले.