Join us

VIDEO: सनी लिओनी चेहरा लपवून करत होती ऑटोतून प्रवास, फोटोग्राफरनी घेरल्यावर रिक्षावाला शॉक्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 10:13 IST

सनी लिओनी या व्हिडीओत चेक पायजामा आणि व्हाइल टॅक टॉपमध्ये आहे.  तिने तिचं डोकं स्कार्फने झाकलेलं आहे आणि चेहऱ्यावर मास्क लावला आहे.

सनी लिओनी इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून भलेही कॉन्ट्रोवर्सीमध्ये राहिली नसेल पण तिने लोकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही ती नेहमीच अॅक्टिव असते. अनेक सिनेमात ती मुख्य भूमिकांसोबत आयटम सॉंग करूनही चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. नुकतीच सनी लिओनी मुंबईत दिसली. ती एका ऑटो रिक्षातून उतरताना दिसली आणि पापाराजींनी तिला घेरलं. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

सनी लिओनी या व्हिडीओत चेक पायजामा आणि व्हाइल टॅक टॉपमध्ये आहे.  तिने तिचं डोकं स्कार्फने झाकलेलं आहे आणि चेहऱ्यावर मास्क लावला आहे. ऑटो रिक्षावाल्याला कदाचित हा अंदाज नव्हता की, त्याची सवारी सनी लिओनी आहे. सनी लिओनी जेव्हा रिक्षातून उतरली तेव्हा रिक्षावाल्याला आश्चर्याचा धक्का बसला. 

सोशल मीडियावर सनीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून फॅन्स तिच्या सिंप्लीसिटीचं कौतुक करत आहेत. तसेच लोक तिच्या फोटोवर कमेंटही करत आहेत. ती ऑटोला ट्रान्सपोर्टेशनचं बेस्ट साधन असल्याचं म्हणाली आहे. सनी लिओनीचं एक गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हे तिच्या आगामी सिनेमातील गाणं असून तिने लावणी केली आहे.  

टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूडसोशल व्हायरल