Join us

Sunny Leone, Video: सनी लिओनीचा 'नादखुळा' शंखनाद... व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 5:17 PM

सनी लिओनी तिच्या बोल्ड अन् बिनधास्त अदांसाठी कायमच चर्चेत असते

Sunny Leone Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्ड बिनधास्त स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस फोटोंसोबतच फनी व्हिडिओही सोशल मीडियावर चांगल्याच गाजताना दिसतात. तिचे विनोदी व्हिडीओ पाहून सनी लिओनी फारच विनोदी स्वभावाची आहे हे आतापर्यंत तिच्या चाहत्यांना माहिती आहेच. याच दरम्यान बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनी हिचा एक मजेदार व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सनी शंखनाद करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. पण त्यात जे घडतंय, त्यामुळे उपस्थित मित्रमंडळींना हसू अनावर होताना दिसतंय. (Playing Conch Shell)

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सनीने हातात एक मोठा शंख धरलेला दिसतो. व्हिडिओच्या सुरुवातीला, ती पूर्ण तयारीनिशी शंखनाद करण्याचा म्हणून शंख वाजवण्याचा प्रयत्न करते. पण शंख वाजवण्याऐवजी तिच्या तोंडातून नुसतीच हवा निघते. जेव्हा सनी तिच्या प्रयत्नात अपयशी ठरते, तेव्हा ती जोरात हसायला लागते, पण ती प्रयत्न सोडत नाही. ती एकदा नव्हे तर तीन वेळा शंख वाजवण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण काही केल्या तो शंख तिला वाजवता येतच नाही. पण तिची झालेली फजिती पाहून मागे बसलेले सर्व लोक मोठ्याने हसायला लागतात. यावर मध्येच सनी देखील म्हणते, 'हसू नका, शंखातून आवाज येतोय'. व्हिडिओतील सनी लिओनीची ही विनोदी स्टाइल पाहून अनेकांना हसू आवरणं कठीण झालं. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ-

काही लोकांनी तिच्या व्हिडीओवर विनोदी प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी, हा शंखाचा अपमान आहे, असं म्हणत तिच्यावर टीका केली. पण ती शंखनाद करण्यात जरी अयशस्वी ठरत असेल तरी तिच्या स्टाईलने तिने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम नक्कीच चोख पार पाडल्याचं दिसत आहे. सनी लिओनीने तिच्या अधिकृत इन्स्टा हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मी जसा विचार केला होता तसे झाले नाही. कोणीतरी मला हे कसे करावे ते शिकवावे लागेल.' व्हिडिओमध्ये सनी लिओनी काळ्या रंगाचा कफ्तान ड्रेस परिधान करून मित्रांसोबत बसली होती. नेहमीप्रमाणेच चाहत्यांना सनीची ही बिनधास्त आणि विनोदी स्टाइल पसंत पडत आहे.

टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरल