Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनी सध्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंग सेटवर होणारी मजा मस्ती ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.आता सुद्धा तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. शूटिंगदरम्यान तिच्या पायाला दुखापत होते आणि म्हणून तिची किती वाईट अवस्था झाली आहे हे तिने दाखवलं आहे.
इंजेक्शनला घाबरली सनी लिओनी
सनी लिओनीच्या पायाच्या बोटाला काहीशी दुखापत झाली आहे. रक्तही येत आहे. म्हणून ती खूपच चिंतेत दिसते. तरी सेटवरील क्रू मेंबर्ससोबत मजा मस्तीही करत असते.बोटाला लोखंड लागल्याने इजेक्शन तर घ्यावंच लागणार. तेवढ्यात एक जण तिला इंजेक्शन द्यायला येते तेव्हा सनी घाबरते, म्हणते, 'नाही इंजेक्शन नाही. स्प्रे मारा इन्जेक्शन नको असंही ती म्हणते.'
सनीची अशी अवस्था बघून नेटकरीही या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. 'वॉव तुझं रक्तही लालच आहे की' अशी मजेशीर कमेंट एकाने केली आहे. तर 'इतक्या सुंदर मुलींनाही इजा होते का' असं एकाने म्हटलं आहे.
सनी लिओनी लवकरच एका दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. त्याचंच शूट सध्या सुरु आहे. प्रत्येक सिनेमासाठी ती प्रचंड मेहनत करताना दिसते. त्याचे व्हिडिओ फोटो ती सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते.