Join us

सेटवर परतली सनी लिओनी, म्हणतेय सेटवर येण्यासाठी बराच काळ करावी लागली प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 15:48 IST

सनी लिओनी सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटाच्या सेटवर परतल्यामुळे खूप आनंदी आहे. काही दिवसांपूर्वी ती पती आणि मुलांसह लॉस एंजेलिसहून मुंबईला परतली आहे. कोरोनामध्ये झालेल्या लॉकडाऊन दरम्यान सनी लिओनीने आपल्या कुटुंबासमवेत क्वॉलिटी टाईम स्पेंट केला.  दीर्घ प्रतीक्षेनंतर सेटवर येऊन त्याने आनंद व्यक्त केला.

सनी लिओनी एका वेब सिरीजची शुटिंग करते आहे आणि स्प्लिट्सविलाच्या 13 व्या सीझनची ती होस्ट आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सनी लिओनी म्हणाली, “मी सेटवर बऱ्याच काळापासून सेटवर परतण्याची वाट बघत होते. माझे शेड्यूल व्यस्त आहे, परंतु मी तक्रार करीत नाही. मी कॅमेर्‍याच्या समोर येण्यासाठी खूप उत्सुक आहे. ''

सनी पुढे म्हणाली, “लॉस एंजेलिसमध्ये मला कुटुंबासमवेत बराच  क्वॉलिटी टाईम स्पेंट केला. मी माझ्या कामाला खूप मिस करते होते.  मी काही इंटरेस्टिंग प्रोजेक्टमध्ये काम करत आहे जे मी माझ्या चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी  प्रतीक्षा करू शकत नाही. ''

सनी लिओनीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव कोका कोला आहे, ज्याचे ती शूटिंग करत आहे. याशिवाय ती दक्षिणात्य चित्रपट झळकणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आले नाही.

टॅग्स :सनी लिओनी