Join us

सनी लिओनीला विचारलेल्या ‘या’ प्रश्नावरून लातुरात आयोजक-पत्रकारांमध्ये ढिशूम... ढिशूम...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2017 12:36 PM

पॉर्न स्टार ते अभिनेत्री असा प्रवास केलेल्या सनी लिओनी ही एका खासगी कार्यक्रमासाठी लातुरात आली असता, चांगलेच रणकंदन पेटले ...

पॉर्न स्टार ते अभिनेत्री असा प्रवास केलेल्या सनी लिओनी ही एका खासगी कार्यक्रमासाठी लातुरात आली असता, चांगलेच रणकंदन पेटले होते. एका फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी आलेल्या सनीला जेव्हा पत्रकारांनी काही प्रश्न विचारले तेव्हा सनीपेक्षा ते आयोजकांच्याच अधिक जिव्हारी लागले. त्यामुळे काही कळायच्या आतच पत्रकार अन् आयोजकांमध्ये जुंपली. हा सर्व प्रकार बघून सनीने लगेचच काढता पाय घेतला. त्याचे झाले असे की, सनी जेव्हा फिटनेस क्लबच्या लॉँचिनसाठी लातुरात आली होती, तेव्हा पत्रकारांनी तिला काही प्रश्न विचारले. एका पत्रकाराने तिला ‘तू बोल्ड चित्रपटांमध्ये काम करतेय याविषयी तुला काय वाटते?’ असा प्रश्न विचारला. त्यावर सनीने उत्तर न देताच आयोजकांनीच पुढाकार घेत त्या पत्रकाराच्या प्रश्नाला विरोध केला. मग काय पत्रकार आणि आयोजकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. पुढे बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्कीत झाल्याने वातावरण काही क्षणातच बदलले.  अशातही सनी लिओनीने आयोजक-पत्रकारांच्या हाणामारीत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तिने दोघांनाही शांत करण्यासाठी ‘इट्स ओके’ असे म्हटले. सनीने आयोजकांना आवरताना ‘इट्स ओके’ असे म्हणत पत्रकारांशी हुज्जत घालू नका याविषयी सांगितले. तसेच प्रकरण अधिक चिघळणार नाही, याचीही तिने पुरेपूर काळजी घेतली; मात्र ती अधिक वेळ घटनास्थळी थांबली नाही, तिने लगेचच तेथून काढता पाय घेतला. सनीने पत्रकारांपासून दूर गेल्यानंतर काही वेळानंतर आयोजकांनीही त्यांचा माफीनामा सादर केला. कदाचित सनीनेच आयोजकांना माफीनामा सादर करण्याचा सल्ला दिला असावा. वास्तविक हा कार्यक्रम सायंकाळी होणार होता; मात्र अचानकच सनीने दुपारी एंट्री केल्याने दुपारीच कार्यक्रम उरकण्याचा आयोजकांनी निर्णय घेतला. त्यानुसार पत्रकारांनाही कार्यक्रमस्थळी आमंत्रित करण्यात आले. त्याचबरोबर तिच्या चाहत्यांनीही कार्यक्रमस्थळी तुफान गर्दी केली होती. या कार्यक्रमात सनीला पत्रकारांना संबोधित करावे लागणार होते. त्यानुसारच एका पत्रकाराने तिला प्रश्न विचारला असता, हा संपूर्ण गोंधळ झाला. सनीने सारवासारव करीत कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घेतला.