मदर्स डेच्या अगोदरच आपल्या मुलांबद्दल सनी लिओनीने केला ‘हा’ खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 2:33 PM
अभिनेत्री सनी लिओनी हिने ही घोषणा करताना सर्वांनाच धक्का दिला होता की, तिने आणि पती डॅनियल वेबरने निशा नावाच्या ...
अभिनेत्री सनी लिओनी हिने ही घोषणा करताना सर्वांनाच धक्का दिला होता की, तिने आणि पती डॅनियल वेबरने निशा नावाच्या मुलीला दत्तक घेतले आहे. या दाम्पत्याने निशाला २०१७ मध्ये दत्तक घेतले होते. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये सरोगेसी पद्धतीने नोआ आणि अशर नावाच्या मुलांची आई बनून पुन्हा एकदा सर्वांनाच धक्का दिला. आता मदर्स डेच्या पूर्वसंध्येला सनीने आपल्या मुलांबद्दल एक खुलासा केला आहे. सनीच्या मते, ‘मी सुरुवातीपासूनच तीन मुलांचा विचार केला होता.’सनीने ई-मेलच्या माध्यमातून आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीपासूनच माझ्या मनात तीन मुलांची कल्पना होती. मात्र काळ निघत गेला, पण मूलबाळ झाले नाही. खरं तर मी एका मुलीसोबत आनंदी जीवन जगले असते. परंतु देवाने आमच्यासाठी वेगळाच विचार करून ठेवला होता. एक मोठा परिवार असावा हे माझे स्वप्न साकार केले. दरम्यान, सनीचा १३ मे रोजी वाढदिवस आहे. योगायोग म्हणजे याच दिवशी मदर्स डे असल्याने हा दिवस तिच्यासाठी स्पेशल आहे. बेबी डॉल या छबीसाठी लोकप्रिय असलेल्या सनीने म्हटले की, हे माझ्यासाठी खरोखरच चांगले आहे की, वाढदिवस आणि मदर्स डे एकाच दिवशी आला. पण मी वाढदिवस साजरा करणार की नाही याविषयी सांगणे मुश्किल आहे. परंतु मदर्स डेची मी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. वास्तविक सनीसाठी मातृत्व हा एक नवा अनुभव असून, सध्या ती त्याचा आनंद घेताना दिसत आहे. याविषयी सनीने म्हटले की, मी आजही पहिल्यासारखीच आहे. परंतु माझ्या मुलांना देण्यासाठी माझ्याकडे भरपूर प्रेम आहे. आई बनल्यामुळे मी खूप आनंदी आहे. २१व्या शतकात लहान मुले आणि तरुणींवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांविषयी विचारले असता सनीने म्हटले की, ‘मला नाही वाटत की गुन्हे वाढले आहेत. माझ्या मते या गोष्टी सुरुवातीपासूनच घडत आहेत. मात्र आता त्याला बातम्यांमुळे जास्तच हवा मिळत आहे.’ यावेळी सनीने अशा प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी इच्छाही व्यक्त केली. सनीने २०१२ मध्ये ‘जिस्म-२’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. अल्पावधीतच सनीने बॉलिवूडमध्ये यश मिळविले. त्याचबरोबर पोर्न स्टारची छबीही तिने पुसण्याचा प्रयत्न केला आहे.