मुंबईतल्या एका मॉलमध्ये सनी एका स्टोअरच्या लाँचसाठी आली होती. मात्र सनीला बघून तिकडे एवढी गर्दी झाली की तिला नियंत्रण करणे कठिण गेले. सनीने मॉलमध्ये एंट्री करताच मॉलच्या आजू-बाजूच्या परिसरातील लोक तिकडे जमले. सनीची एक झलक प्रत्येकाला हवी होती. गर्दी ऐवढी प्रचंड वाढली होती की सनीला स्टोर लाँच करुन झाल्यावर तिला तिथून बाहेर पडणे कठिण झाले.
गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी स्टोअरच्या मालकांने आणि डिझायनरने सुरक्षेच्या कारणास्तव स्टोअर बंद केले. घाई-घाईत स्टोरचे शटर दोन्ही बाजूने बंद केले. जेणेकरुन तिथल्या लोकांना वाटावे की सनी तिथून निघून गेली आहे. स्टोअर जवळपास 1 तास बंद ठेवण्यात आले. शटर बंद करताना काळजी न घेतल्यामुळे सनी लिओनी आताच राहिली. सनीसोबत तिचा नवरा डेनियलसुद्धा होता.
इव्हेंट संपल्यावर शटरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र शटर ओपन होत नव्हते. अनेक प्रयत्न केल्यानंतरही शटर ओपन व्हायला तयार नव्हते. त्यानंतर मॉलच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण लाईट बंद केली आणि शटर पुन्हा एकदा रिसेट करुन ओपन आले. यासगळ्यात जवळपास एक तास गेला. त्यामुळे सनी आणि डेनियला एक तास काळोखात रहावे लागले. स्टोर उघडल्यावर लगेच सनी आणि डेनियल मॉलमधून बाहेर निघून गाडीत जाऊन बसले. नुकतीच सनी सबुकवर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टच्या अनुसार, फेसबुकवर सनीला सर्वाधिक सर्च केले जात असल्याची बाब समोर आलीय. सेलिब्रिटींना मागे टाकत सनीने 100 गुणांसह सर्वाधिक चर्चित फेसबुक सेलिब्रिटी असल्याचं आढळून येते आहे.