Join us

सनी लिओनी गिरवतेय बॉक्सिंगचे धडे, शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 21:36 IST

सनी लिओनी बॉक्सिंगचे धडे गिरविते आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिओनी आपल्या फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. ती लॉस एंजेलिसमध्ये आपल्या मुलांसह आणि पती डेनियलसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतेय. सोशल मीडियाच्या माध्यमातून सनी फॅन्सच्या संपर्कात असते. सनी पती आणि मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सनीचे चाहते ही तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती दर्शवत असतात. सध्या ती बॉक्‍सिंग धडे गिरविते आहे आणि ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

ट्रेनिंगच्या पहिला दिवसाचा फोटो तिने पोस्ट करून चाहत्यांना माहिती दिली आहे. ट्रेनिंगच्या आधी आणि नंतर माझा चेहरा असाच टमाटरसारखा लाल असतो, हे सगळं सहन करत मी पुन्हा यासाठी तयार आहे, असे तिने कॅप्शन दिले आहे.

सध्या ती तिच्या कुटुंबाबरोबर बाहेर देशात आहे. दत्तक घेतलेल्या तिन्ही मुलांना ती काहीना काही शिकवण्यात व्यस्त असते. मुलीला पोहणे शिकवत होती. त्याचा व्हिडियोसुद्धा तिने शेअर केला होता.

सनी लिओनी एक पॉर्नस्टार म्हणून तिच्या करियरला सुरुवात केली. 'जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सनी रागिनी एमएमस 2 मध्ये दिसली होती. सनी 'वीरामादेवी' आणि 'कोका कोला'मध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :सनी लिओनी