सनी लिओनीने या व्यक्तीसोबत केले होते अनेक पॉर्न सिनेमांमध्ये काम, शेवटी त्यानेच दिला धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 03:29 PM2020-04-06T15:29:16+5:302020-04-06T15:30:39+5:30
याच व्यक्तीमुळे सनीने पॉर्न इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली होती.
बेबी डॉल सनी लिओनी आज बॉलिवूडची एक मोठी स्टार आहे. पण आजही तिची पॉर्न स्टार ही ओळख पूर्णपणे पुसली गेलेली नाही. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सनी पॉर्न स्टार होती. पण पॉर्न स्टार बनण्यासाठीचा तिचा संघर्षही कमी नव्हता. एकेकाळी पैशांसाठी सनी पहाटे पेपर वाटायची. बेकरीमध्ये काम करायची. तिच्या आयुष्यावर करंजीत कौर-द अन्टोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
सनीने पॉर्न इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली खरी, पण एका अटीवर. होय, मी केवळ बॉयफ्रेन्डसोबत पॉर्न सीन्स शूट करेल, ही तिची अट होती. याच अटीवर 2007 मध्ये तिने पहिला कॉन्ट्रक्ट साईन केला होता. यानंतर सनी आणि तिच्या बॉयफ्रेन्डने एकूण सहा पॉर्न फिल्म केल्या. या बॉयफ्रेन्डचे नाव होते, मेट एरिक्सन. प्लेबॉयमध्ये काम करणाऱ्या मेट एरिक्सन यानेच सनीला पॉर्न इंडस्ट्रीत येण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. पुढे सनी आणि मेट एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या वेळी मेट हेच सनीचे विश्व होते. त्याला हवे तसे, सनीने केले. खरे तर पॉर्न इंडस्ट्रीत आली तेव्हा सनी केवळ 19 वर्षांची होती. त्यामुळे दोघांच्या वयात मोठा फरक होता. शिवाय मेटचे आधीच लग्न झाले होते. यानंतर त्याने पत्नीला घटस्फोट दिला होता.
मेटच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सनीने मेटसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये दोघांचा साखरपुडाही झाला. पण त्यानंतर त्यांच्यात बिनसले. काही वर्षांनंतर जेव्हा सनी बिग बॉस या रिअॅलिटी शो मध्ये दिसली, तेव्हा मेटने सनीच्या नावावर प्रचंड पैसा कमावला. सनीचे कंपनीद्वारे बनवलेले अनेक व्हिडिओ त्याने विकले. हे सर्व सनीसाठी प्रचंड धक्कादायक होते. यानंतर सनीच्या आयुष्यात कॅनडाचा सुप्रसिद्ध कॉमेडियन रसेल पीटर्सची एन्ट्री झाली. पण हे नातेही फार काळ टिकले नाही. रसेलनंतर सनीला डॅनिएल वेबर भेटला. 2011 मध्ये सनीने डॅनिएलशी लग्न केले.