Join us

निशाला दत्तक घेतल्यानंतर सनी लिओनीचे बदलले आयुष्य; वाचा तिने कथन केलेला अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 1:36 PM

बॉलिवूडची हॉट नायिका सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबर यांनी काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील एका अनाथलयामधून एक मुलगी ...

बॉलिवूडची हॉट नायिका सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबर यांनी काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील एका अनाथलयामधून एक मुलगी दत्तक घेतली आहे. मुलीचे नाव निशा ठेवण्यात आले असून, सनी आणि तिचा पती सध्या पालक झाल्याचा आनंद अनुभवत आहेत. मुंबई मिररशी बोलताना सनीने सांगितले की, ‘मला जे हवे होते ती माझी मुलगी माझ्यासाठी सर्वात बेस्ट गिफ्ट आहे.’ ३६ वर्षीय सनीने म्हटले की, ‘ती खूपच सुंदर आणि अमेझिंग आहे. अनाथालयातून घरी येईपर्यंत ती आमच्यासोबत तिचे नवे आयुष्य अ‍ॅडजेस्ट करीत होती. हे आमच्यासाठी खूपच मजेशीर होते.’ या दाम्पत्याने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मुलगी दत्तक घेण्यासाठी अप्लाय केले होते. पुढे जून २०१७ मध्ये त्यांनी निशाला दत्तक घेतले. सध्या सनी बºयाचशा प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. अशातही जेव्हा तिला आई झाल्याच्या अनुभवाविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, ‘सकाळी जेव्हा ती उठते तेव्हा मी तिच्यासमोर असते. मला तिला जेवण भरविणे तिच्यासोबत खेळणे खूप आवडते. निशामुळे माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. डेनियल आणि मी नेहमीच तिच्यासोबत असणार आहे. आम्ही तिच्यासाठी सर्व काही करू इच्छितो. कारण अगोदरच तिच्या आयुष्यातील बराचसा काळ व्यर्थ गेला आहे. अशात आम्ही तो काळ भरून काढण्याचा सातत्याने प्रयत्न करणार आहोत. आता तिने ही बाब समजून घेण्याची गरज आहे की, आम्ही तिचे पॅरेंट्स असून, तिच्यावर आयुष्यभर प्रचंड प्रेम करणार आहोत.’वास्तविक, सनी आणि डेनियलने गेल्या दोन वर्षांपूर्वीच मूल दत्तक घेण्याचा विचार केला होता. यासाठी त्यांनी तेव्हापासूनच पेपरवर्क करण्यास सुरुवात केली होती. मात्र यास बराचसा विलंब झाला. एका मुलाखतीत सनीने म्हटले होते की, ‘हा नऊ महिन्यांचा काळ माझ्यासाठी दोन वर्षांचा होता.’ दोन वर्षांपूर्वी सनी आणि डेनियलने भारत सरकार आणि सीएआरएकडे (केंद्रीय दत्तक योजना) एक मूल दत्तक घेण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर निशा या दोघांच्या आयुष्यात आली. निशाला दत्तक घेतल्यानंतर सनी आणि डेनियलला सगळ्यात मोठी अडचण जाणवली ती म्हणजे ‘भाषा’! कारण निशाला आपल्या मम्मी-डॅडीबरोबर इंग्रजी भाषेत बोलणे आणि त्यास समजून घेण्यास बरीचशी अडचण येत होती. निशाला केवळ मराठी समजत असल्याने ती इंग्रजी समजण्याचा प्रयत्न करीत होती. सध्या निशा इंग्रजीमध्ये बोलणे शिकत असून, तिला ‘बाय-बाय’ हा शब्द बोलता येत असल्याचे सनीनेच एका मुलाखतीत स्पष्ट केले होते.