Join us

खरा पुरुष तोच जो या गोष्टीला अधिक प्राधान्य देतो, सनीने पतीचे उदाहरण देऊन इतरांनाही केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 15:46 IST

Sunny praises his husband Daniel,इतकेच नाही तर इतर पुरुषांनी देखील डॅनिअलसारखे दृष्टिकोन ठेवावा. त्यामुळे प्रत्येकाने महिलांना मदत करा असे आवाहन तिने केले आहे.

बेबी डॉल सनीच्या हॉट अदांच्या चर्चा नेहमीच रंगत असतात..... तिच्या बोल्ड अदा आणि नख-यांवर सारेच होतात फिदा. तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल.ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सनी प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे. सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला आहे. 

या फोटो शेअर करताना तिने साऱ्यांना विचार करायला भाग पाडेल असाच एक किस्सा सांगितला आहे. प्रत्येक पुरुषाने कठीण समयी महिलांची मदत केली पाहिजे.सनीचा पती डॅनियलने एका महिलेच्या कारच्या गाडीचे टायर बदलण्यात मदत केली.पती डॅनिअलच्या या कामामुळे सन्नी इतकी काही भारवलीय की, तिने थेट पतीचे कौतुक करण्यासाठी सोशल मीडियावरच पोस्ट शेअर केली.इतकेच नाही तर इतर पुरुषांनी देखील डॅनिअलसारखे दृष्टिकोन ठेवावा. त्यामुळे प्रत्येकाने महिलांना मदत करा असे आवाहन तिने केले आहे.

पती डॅनिअल आणि मुलांसोबत सनी कायमच पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. सध्या ती तिच्या मुलांसह कुटुंबासह अधिक वेळ घालवतना दिसते.

सनी लियोनला बॉलीवूडमध्ये येऊन अजून फारसा कालावधी झालेला नाही, अल्पावधीतच तिने रसिकांची पसंती मिळवली. सनी लियोन ही पहिल्यांदा 'बीग बॉस-५' या रिअँलिटी शोद्वारे २0११ मध्ये पहिल्यांदा दिसली होती...ती. त्यानंतर 'जिस्म-२' या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता.

टॅग्स :सनी लिओनी