बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा गदर २ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. तब्बल २२ वर्षानंतर रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा चर्चेत आहे. यामध्येच आता सनी देओलने या सिनेमासाठी नेमकं किती मानधन घेतलं ही नवीन चर्चा सुरु झाली आहे. या चर्चांवर आता सनी देओलने उत्तर दिलं आहे.
अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' या सिनेमात सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. सनीने उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा तारासिंग ही भूमिका जीवंत केली. त्यामुळे सर्व स्तरांमधून त्याच कौतुक होत आहे. यामध्येच ५०० कोटींची कमाई करणाऱ्या या सिनेमासाठी सनीने तगड मानधन घेतल्याचं म्हटलं जात होतं. यावर आता सनीने उत्तर दिलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 'गदर २'साठी सनीने ५० कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, त्याने नेमकं किती मानधन घेतलं याचा खुलासा त्याने केला. "हे पाहा, यावर मी बोलणं योग्य नाही. एखाद्या अभिनेत्यानं किती मानधन घेतलं हे काही जाहीरपणे सांगायची गोष्ट नाही. काही गोष्टी इतक्या मोकळेपणाने सांगितल्या जात नाहीत. त्याला काही मर्यादा आहेत. मला किती पैसे द्यायचे हे निर्मात्यांनी ठरवायचं, त्यांनी किती कमावले यावर मला किती द्यायचे हे ठरणार आहे", असं सनीने म्हटलं.
पुढे तो म्हणतो, "मला अमक आवडत नाही. मला हे पसंत नाही.. अशा माझ्या कोणत्याही प्रकारच्या अटी नाहीत. मला भविष्यातही काही प्रोजेक्ट्समध्ये काम करायचं आहे. त्यामुळे मला कोणावरही ओझं म्हणून रहायचं नाही. याची मी कायम काळजी घेत राहीन." दरम्यान, गदर २ ला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे लवकरच गदर ३ देखील येणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी गदर २ ची सक्सेस पार्टी झाली. या पार्टीत बॉलिवूडचे तीनही खान एकत्र दिसून आले.