Join us

हृतिक रोशनच्या सुपर 30 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई, वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 2:31 PM

सुपर 30 या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा खूपच चांगला फायदा होत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

ठळक मुद्देसुपर 30 या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ११.८३ करोड रुपये कमावले होते. आता केवळ चार दिवसांत या चित्रपटाने ६० कोटींच्या जवळपास गल्ला जमवला आहे.

हृतिक रोशनच्यासुपर 30 या चित्रपटाला समीक्षकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा खूपच चांगला फायदा होत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

सुपर 30 या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ११.८३ करोड रुपये कमावले होते. आता केवळ चार दिवसांत या चित्रपटाने ६० कोटींच्या जवळपास गल्ला जमवला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अशीच दमदार कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुपर 30 या चित्रपटाने सोमवारी १० करोडची कमाई केली आहे.

ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्शच्यामते, सुपर 30 हा चित्रपट हृतिकच्या मोहनजोदडो, काबील यांसारख्या चित्रपटांपेक्षा खूप चांगला व्यवसाय करत आहे. या चित्रपटाने शुक्रवारी ११.८३ करोड, शनिवारी १८.१९ करोड, रविवारी २०.७४ करोड इतके कलेक्शन केले होते. केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने परदेशात १५.३९चा गल्ला जमवला आहे.

बिहारमध्ये तर आता सुपर 30 हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे आणि त्यामुळे या चित्रपटाचे तिकीट बिहारमध्ये अधिक स्वस्त होणार आहे. याचा फायदा बॉक्स ऑफिस कलेक्शनला होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. 

‘सुपर 30’ हा सिनेमा गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमातंर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.  

‘सुपर 30’ हा चित्रपट नोव्हेंबर 2018 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलचे नाव मीटू मोहिमेत आले. त्यामुळे त्याला या चित्रपटातून हटवण्यात आले. साहजिकच ‘सुपर 30’लांबला. पुढे या चित्रपटासाठी 26 जानेवारी 2019 चा मुहूर्त ठरला. पण यावेळी कंगनाचा ‘मणिकर्णिका’ आडवा आला. त्यामुळे हृतिकने ‘सुपर 30’ची रिलीज डेट पुढे ढकलली होती. 

टॅग्स :सुपर 30हृतिक रोशन