Join us

सुपर क्यूट थ्रोबॅक फोटो; ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील स्टार्सला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 16:23 IST

एक-दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलीवूड स्टार्स आहेत या फोटोत

बऱ्याचदा कलाकार त्यांच्या बालपणींचे फोटो आणि त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होतात. बॉलिवूडमधील बरेचसे चेहरे जे बालपणापासून आतापर्यंत त्यांच्यात इतका बदल झालाय की ते ओळखता देखील येत नाहीत. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत बॉलिवूडमधील एक-दोन नव्हे तर 5 दिग्गज स्टार्स दिसत आहेत. बालपणींचे फोटो पाहून पाहा तुम्हाला ते ओळखता येतात का?

बॉलीवूड अभिनेता अरमान जैनने काही दिवसांपुर्वी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक गोंडस फोटो पोस्ट केला होता. या फोटोत  रणबीर कपूर, अर्जुन कपूर, सोनम कपूर, अंशुला कपूर, हर्षवर्धन पाहायला मिळत आहेत.  अरमान जैन हा रिमा जैन आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे. रिमा जैन या ऋषी कपूर, राजीव कपूर आणि रणधीर कपूर यांच्या बहिण आहेत.

या फोटोमध्ये सोनम कपूर तिचा भाऊ हर्षवर्धन कपूरला काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर अर्जुन कपूर त्याच्या शेजारी लाल टी-शर्टमध्ये चष्मा लावून बसलेला दिसत आहे. तर सोनम कपूरच्या पाठीमागे अंशुला तिच्या मांडीत लहान मूल घेऊन दिसत आहे. तर रणबीर कपूर हा फोटोत सर्वात मागे आहे. ज्याने एका मुलाच्या डोक्यावर हात ठेवून Victory Sign दाखवले आहे. शिवाय यात रिद्धिमा कपूर साहनी, पूजा देसाईदेखील आहे.

टॅग्स :बॉलिवूडरणबीर कपूरसोनम कपूरअर्जुन कपूर