Join us

बाबो! बॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या 2 मुलांच्या बापावर जीव ओवाळते श्रुती हसन, जाणून घ्या कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 5:11 PM

श्रुती हासन (Shruti Haasan) सध्या तिच्या आगामी 'सालार' (‘Salaar) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

श्रुती हासन (Shruti Haasan) सध्या तिच्या आगामी 'सालार' (‘Salaar) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून यामध्ये ती पहिल्यांदाच बाहुबली फेम प्रभाससोबत दिसणार आहे. 150 रुपयांच्या बजेटमध्ये तयार होणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन  प्रशांत नील करत असून तो तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

श्रुती हासन अनेकदा तिचा बॉयफ्रेंड शंतनू हजारिका(Santanu Hazarika) सोबत स्पॉट झाली आहे. दोघांमध्ये कमाल बॉन्डिंग असून शंतनूनेही याचा खुलासा केला आहे. पण श्रुतीचं मन लहानपणापासूनच एका बॉलिवूड सुपरस्टारवर अडकलेलं आहे आणि ती दुसरी कोणी नसून माचो मॅन हृतिक रोशन  (Hrithik Roshan)आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे.

श्रुतीला तिच्या आवडत्या स्टारसोबत चित्रपट करण्याची संधी मिळाली नाही आहे. ए.आर. मुरुगादास दिग्दर्शित चित्रपटात हृतिक श्रुतीसोबत स्क्रिन शेअर करेल अशी अफवा 2017 मध्ये पसरली होती पण तसे झाले नाही. तथापि, आम्हाला आशा आहे की त्याला लवकरच अभिनेता हृतिकसोबत चित्रपट मिळेल. श्रुती हासन लवकरच प्रभाससोबत 'सालार'मध्ये दिसणार आहे जो 14 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

साऊथचा सुपरस्टार कमल हसनची मुलगी श्रुती हसनने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तेलुगू आणि तमिळ तसेच हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. हिंदी सिनेमात तिला हवे तसे यश मिळाले नाही. पण दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे अभिनयातच नाहीतर गायनातही तिला प्रचंड रस आहे.श्रुती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम गायिका देखील आहे.

टॅग्स :श्रुती हसनहृतिक रोशन