सुपरस्टार पवन कल्याणवर फेकली चप्पल, वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 1:54 PM
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि राजकीय नेता पवन कल्याण याला एका कटू अनुभवाचा सामना करावा लागला. होय, जेव्हा तो एका ...
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि राजकीय नेता पवन कल्याण याला एका कटू अनुभवाचा सामना करावा लागला. होय, जेव्हा तो एका रोड शोमध्ये सहभागी झाला होता, तेव्हा त्याच्यासोबत एक प्रसंग घडला. गेल्या बुधवारी पवन कल्याण तेलंगणेतील खम्मम जिल्ह्यात पोहोचला होता. यावेळी तो एका रोड शोमध्ये सहभागी झाला होता. मात्र याचदरम्यान त्याच्यावर एका व्यक्तीने चक्क चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. चप्पल कोणी फेकली हे जरी स्पष्ट होऊ शकले नसले तरी, पोलिसांनी लगेचच गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पवन अभिनयाबरोबरच जनसेना पक्षाचा अध्यक्ष आहे. त्याने ‘जय तेलंगणा’ असा नारा लावल्याने त्या भागात पवनचे चांगलेच वर्चस्व वाढताना दिसत आहे. त्यातच पवन कल्याणने याअगोदरच त्याचा पक्ष आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने इतर पक्षांचे धाबे दणाणले आहेत. द न्यूज मिनटच्या एका रिपोर्टनुसार, अभिनेता पवन कल्याण सध्या पक्षवाढीसाठी विविध जिल्ह्यांमध्ये रोड शो करीत आहे. या रोड शोदरम्यानच त्याच्यावर कोणीतरी चप्पल फेकल्याची घटना घडली. सुदैवाने त्याला ही चप्पल लागली नाही. तो कारमध्ये उभा होता त्या कारच्या समोरच्या भागावर चप्पल लागली. यावेळी आणखी एक अनुचित घटना घडली. ज्या कारमध्ये पवन कल्याण उभा होता त्याच कारच टायर एका पोलीस अधिकाºयाच्या पायावरून गेले. हा पोलीस अधिकारी रोड शोच्या बंदोबस्तात होता. रिपोर्टनुसार, पवनला या प्रकरणाविषयी काहीच माहिती नव्हती. जेव्हा त्याला याविषयी कळाले तेव्हा त्याने लगेचच त्याच्या पर्सनल असिस्टंटला बोलावून पोलिसाच्या प्रकृतीविषयी विचारणा केली. एवढेच काय तर पवनने त्या पोलीस अधिकाºयावर चांगले उपचार करता यावेत म्हणून त्याला हैदराबादला पाठविण्याबद्दल विचारणा केली.आगामी निवडणुका लक्षात घेऊन पवन सध्या ‘चलो रे’ या नावाने राज्यभरात दौरे करीत आहे. त्याच्या चार दिवसीय दौºयात मीडियाशी बोलताना पवनने सांगितले की, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांत माझा पक्ष निवडणुका लढणार आहे. आम्हाला विरोधकांची भीती वाटत नसून, लोकांचे प्रश्न समोर ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.