Join us

सुप्रिया पिळगांवकरांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाल्या, 'माझ्या वडिलांनी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 9:09 AM

सुप्रिया पिळगांवकरांनी सिनेमा पाहिल्यावर लहानपणीची एक आठवण सांगितली आहे.

थोर क्रांतीकारी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. रणदीप हुड्डाने वीर सावरकरांची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली. सध्या सिनेमाचं आणि रणदीपच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. या सिनेमातून रणदीपने दिग्दर्शनातही पाऊल ठेवलं. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांनीही सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिनेमाचं कौतुक केलं आहे.

सुप्रिया पिळगांवकर यांची पोस्ट

"मी १२ वर्षांची असताना शाळेच्या सुट्टीत माझ्या वडिलांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं. चांगलंच जाडजूड पुस्तक होतं. सुट्टी संपेपर्यंत मी ते पूर्ण वाचणं अपेक्षित होतं. मी वाचायला सुरुवात केली आणि ते संपेपर्यंत मी थांबूच शकले नाही. सुरुवातीला वाचनात अनेक अडथळे आले कारण मी मध्येच रडत होते, हुंदते देत होते, अर्ध्या भागापर्यंत मी स्तब्ध झाले होते. तेच पुस्तक म्हणजे माझी जन्मठेप काल जीवंतरुपात समोर आलं. वीर सावरकर सिनेमा. तुम्ही हा सिनेमा पाहण्याचं धाडस दाखवू शकाल का?"

लहानपणी वाचलेलं पुस्तकच प्रत्यक्षात समोर आल्याची जाणीव होणं याहून सुंदर विश्लेषण ते काय. सुप्रिया पिळगांवकर यांनी शेअर केलेली ही पोस्ट वाचून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.'पुस्तकाचा पहिला परिच्छेदच इतका जबरदस्त आहे की त्यातून वीर सावरकर हे मानसिकदृष्ट्या किती कणखर होते हे लक्षात येतं.' अशी कमेंट एकाने केली आहे. 

रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात अंकिता लोखंडेने त्यांच्या पत्नीची यमुनाबाईची भूमिका साकारली आहे. सिनेमात अनेक असे सीन्स आहेत जे अंगावर शहारे आणणारे आहेत. प्रत्येक देशभक्ताने एकदा तरी हा सिनेमा पाहण्यासारखाच आहे.

टॅग्स :सुप्रिया पिळगांवकरविनायक दामोदर सावरकरसिनेमारणदीप हुडा