Join us

Suriya Sivakumar : ‘जय भीम’ फेम सूर्याने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 15:07 IST

Suriya Sivakumar : होय, सूर्या आता मुंबईकर होणार आहे. सूर्याने मुंबईत नवं अलिशान घर खरेदी केलं आहे.

Suriya Sivakumar : सूर्या हा साऊथचा लोकप्रिय अभिनेता. सर्वानन शिवकुमार त्याचं खरं नाव. पण तो ओळखला जातो तो सूर्या याच नावाने. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचं अपार कौतुक झालं. हाच सूर्या आता मुंबईकर होणार आहे. होय, सूर्याने मुंबईत नवं अलिशान घर खरेदी केलं आहे.

सूर्या त्याची पत्नी ज्योतिकासोबत मुंबईत शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. आता सूर्याने मुंबईत एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केल्याचं कळतंय. इंडियाग्लिट्झने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता सूर्याने मुंबईतील पॉश भागात एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे. ९००० स्क्वेअर फूट एरिया असलेल्या या अपार्टमेंटसाठी सूर्याने ६८ कोटी रुपये मोजल्याची माहिती आहे. 

सूर्या त्याची पत्नी अभिनेत्री ज्योतिका आणि मुलांना घेऊन मुंबईत स्थलांतरित होण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. मुंबईत मोठ्या संधी मिळत असल्यानं त्याने हा विचार केल्याचं कळते. सूर्याची पत्नी ज्योतिका ही सुद्धा अभिनेत्री आहे. एका चित्रपटाच्या सेटवर सूर्याची भेट अभिनेत्री ज्योतिका हिच्याशी झाली. या दरम्यान त्यांच्यात छान मैत्री झाली, या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. आता ही जोडी दोन मुलांची पालक आहे.  

सूर्या हा प्रसिद्ध तमिळ अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा आहे आणि त्याचा भाऊ कार्तीही साऊथ चित्रपटांचा प्रसिद्ध चेहरा आहे. 1995मध्ये सूर्याला एक चित्रपट ऑफर करण्यात आला होता. मात्र, त्याने तो नाकारला. यानंतर त्याने 1997मध्ये 'नेररुक्कू नेर' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. मात्र, त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख दिली ती 'नंदा' या चित्रपटाने.  ‘कादल निम्माधी’, ‘कृष्णा’, ‘श्री’, ‘काका काका’, ‘सिंघम’, ‘निनातू यारो’, ‘अंजान’, ‘कल्याणरामन’, ‘24’, ‘जय भीम’, ‘सूरराय पोतरू’ यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.

टॅग्स :Tollywood