Join us

सुपरस्टार सूर्याच्या ‘सोरारई पोटरू’चा वर्ल्ड रेकॉर्ड, IMDbवर ठरला तिसरा सर्वाधिक रेटींगचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 4:58 PM

Soorarai Pottru : तामिळ सुपरस्टार सूर्याचा (Suriya)) ‘सोरारई पोटरू’ या तामिळ सिनेमाने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

ठळक मुद्देबैलगाडीतून प्रवास करणारा एक गावकरी गावासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने कसा झपाटून जातो आणि स्वत:ची एअरलाईन्स स्थापन करतो, त्याच्या यशाची ही गोष्ट आहे.

तामिळ सुपरस्टार सूर्याचा (Suriya)) ‘सोरारई पोटरू’ (Soorarai Pottru) या सिनेमाने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. IMDb च्या जगभरातील मोस्ट रँक्ड चित्रपटाच्या यादीत ‘सोरारई पोटरू’ने तिसरे स्थान पटकावले आहे. IMDbवर सूर्याच्या या सिनेमाला 9.1 रेटींग मिळाले आहे. (Suriya starrer Soorarai Pottru sets World Record)मोस्ट रँक्ड 100 सिनेमांच्या यादीत पहिल्या व दुस-या क्रमांकावर दोन हॉलिवूड सिनेमे आहेत. पहिल्या क्रमांकावर ‘शव्शांक रिडेम्पशन’ आणि दुस-या स्थानावर ‘गॉडफारद’ आहे तर तिस-या स्थानावर सूर्याचा सिनेमा आहे.

‘सोरारई पोटरू’ हा सिनेमा गतवर्षी कोरोना महामारीदरम्यान रिलीज झाला होता. या सिनेमावर चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडल्या होत्या. समीक्षकांनी या सिनेमाचे प्रचंड कौतुक केले होते. चित्रपटगृहे बंद असल्यामुळे ऐनवेळी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय झाला होता. तरीही लोकांनी तो खूप पाहिला़ सूर्या यात लीड रोलमध्ये होता तर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.सुधा कोंगाराने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. शांघाय फिल्म फेस्टिवलमध्येही हा सिनेमा दाखवण्यात आला होता.

अशी आहे कथा...

बैलगाडीतून प्रवास करणारा एक गावकरी गावासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने कसा झपाटून जातो आणि स्वत:ची एअरलाईन्स स्थापन करतो, त्याच्या यशाची ही गोष्ट आहे. हे कथानक डेक्कन एअरलाईन्सचे संस्थापक कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांच्या आयुष्यावर आधारित ‘सिंपल फ्लाय’ या पुस्तकावर बेतलेले आहे. त्यांच्या संघर्षाची ही कथाच मुळी मनाचा ठाव घेणारी आहे. नेदूमारन राजांगम हे यातील मुख्य पात्र. नेदूमारन सर्व थरातील लोकांना हवाई प्रवास परवडावा म्हणून धडपडत असतो आणि शेवटी यशस्वी होतो. अपर्णा बालमुरलीने यात सूर्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

टॅग्स :Tollywood