अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे निधन होऊन दोन महिने उलटून गेले. सुशांतचे कुटुंबीय अजूनही या दु:खातून बाहेर येऊ शकले नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजमच्या मुद्द्याला घेऊन वादळ उठले. दिग्दर्शक करण जोहरला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. नेपोटिजमच्या मुद्द्यावरुन करण जोहरवर निशाणा साधण्यात आला.
सतत होणाऱ्या ट्रोलिंगमुळे करण जोहर सोशल मीडियावरुन गायब झाला होता. आधी त्याने ट्विटरवर वरुन अनेकांना अनफॉलो केले त्यानंतर पोस्ट करणं देखील थांबवले. दीर्घकाळानंतर करण जोहर सोशल मीडियावर पुन्हा अॅक्टिव्ह झाला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर स्वातंत्र्य दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. करणने तिरंग्याचा फोटो शेअर करताना लिहिले, त्या महान देशाला, त्या महान संस्कृतीला आणि त्या महान इतिहासला, सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद.
करणने पूर्वी शेअर केलेली शेवटची पोस्ट सुशांत सिंग राजपूतच्या स्मरणार्थ होती. ही गोष्ट सुशांतच्या फॅन्सना आवडली नव्हती आणि ट्रोल करायला सुरुवात केली. कंगना राणौत करण जोहरवर बरसली होती. करणवर चारही बाजूने टीकेची झोड उठली होती. मात्र करणने यावर मौन बाळगणेच पसंत केले.