Join us

‘सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या केली गेली...’; तपास यंत्रणांवर भडकले शेखर सुमन!!

By रूपाली मुधोळकर | Published: October 11, 2020 12:19 PM

शेखर सुमन यांचे ट्विट

ठळक मुद्देसुशांतने आत्महत्या केली, असा निष्कर्ष सीबीआयने या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासातून काढला आहे. एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनीही सुशांतसिंहने आत्महत्याच केली असल्याचे आपल्या अहवालात म्हटले होते.

 सुशांत सिंग प्रकरणी गेल्या काही दिवसांत अशा काही बाबी समोर आल्यात की, चाहते नाराज झालेत.  सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्या आहे, असा अहवाल एम्सच्या टीमने सीबीआयला दिला. पाठोपाठ ड्रग्ज प्रकरणात अटक झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलाही जामीन मंजूर झाला. या दोन घटनाक्रमामुळे सुशांत केसचे अख्खे समीकरण बदलले आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेते शेखर सुमन यांनी केलेले एक  ट्विट चर्चेत आले आहे. या  ट्विटमध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

‘सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या केली गेली. श्वास गुदमरला की, असेच फिक्स केले,’ असे  ट्विट शेखर सुमन यांनी केले आहे. या  ट्विटचा अर्थ स्पष्ट आहे. शेखर यांनी थेटपणे तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आता घरी चला...

यापूर्वीही शेखर सुमन यांनी एक असेच ट्विट केले होते. एम्सचा अहवाल पाठोपाठ रियाला जामीन मिळाल्यानंतर त्यांनी हे  ट्विट केले होते. ‘रियाला जामीन मिळाला आहे आणि आता ती जेलमधून बाहेर आली आहे. सीबीआय आणि एम्सच्या अहवालात कोणताही विरोधाभास नाही. मिरांडा आणि दीपेश यांना देखील जामीन मिळाला. आता कोणतीही दुसरी फॉरेन्सिक टीम तयार केली जाणार नाही. सर्व संपलं. आता घरी जाऊया’, या आशयाचे ट्विट करत शेखर सुमन यांनी नाराजी व्यक्त केली होती.

सीबीआयही म्हणते सुशांतसिंहने आत्महत्याच केली, एम्सला दुजोरा

सुशांतने आत्महत्या केली, असा निष्कर्ष सीबीआयने या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासातून काढला आहे. एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनीही सुशांतसिंहने आत्महत्याच केली असल्याचे आपल्या अहवालात म्हटले होते. सुशांतसिंह मरण पावला त्यावेळचा सारा घटनाक्रम सीबीआयने पुन्हा तपासून पाहिला होता. तसेच या अभिनेत्याच्या बँक खात्यातून जे व्यवहार झाले त्यात संशयास्पद असे काहीही सीबीआयला सापडलेले नाही. त्यामुळे रिया चक्रवर्तीने स्वत:च्या आर्थिक लाभासाठी अशी काही कृत्ये केली की ज्यामुळे सुशांतला आत्महत्या करणे भाग पडले असा जो संशय व्यक्त करण्यात येत होता तो निरर्थक असल्याचे सीबीआयच्या आजवरच्या तपासातून सिद्ध झाले आहे.

त्यामुळे सुशांतसिंहने आत्महत्या करण्यामागचे आणखी नेमकी कारणे काय असावीत याचा शोध आता सीबीआय घेत असल्याचे या तपासयंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले. रिया चक्रवर्तीकडून आणखी काही गैरकृत्ये झाली होती का किंवा व्यावसायिक शत्रूत्वाला कंटाळून सुशांतने आत्महत्या केली का? या गोष्टींचा शोध आता सीबीआय तपासादरम्यान घेत आहे.

सुशांतसिंह राजपूत केसमध्ये नवे काय?

राजकीय साठमारीत भरडली गेली एक हसीना

गेल्या पाच वर्षांत सुशांतसिंह राजपूत याच्या बँक खात्यातून ७० कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यातील फक्त ५५ लाख रुपयांच्या व्यवहारांशी रिया चक्रवर्तीचासंबंध आला आहे. त्यातील सर्वाधिक रक्कम भेटवस्तू देणे, स्पामध्ये जाणे किंवा प्रवासावर खर्च झाली आहे.सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, रिया चक्रवतीर्मुळेच सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली असावी असा सीबीआयला संशय होता. मात्र तसा कोणताही पुरावा सीबाआयला अद्याप मिळालेला नाही. सुशांतसिंह याच्या बँक खात्यातून रियानेपैसे लांबविल्याचा कोणताही पुरावा सीबीआयला मिळालेला नाही. रियावर सुशांतसिंहने खर्च केलेल्या पैशाचा हिशेब व्यवस्थितपणे मिळू शकतो.

टॅग्स :शेखर सुमनसुशांत सिंग रजपूत