बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला आज एक महिना पूर्ण झाला. आज सगळेच सुशांतला मिस करत आहेत. सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती हिनेही अभिनेत्याच्या आठवणीत एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा तिने त्याच्यासोबतचा स्वत:चा फोटोही शेअर केला आहे. ‘ मी तुला कधीच स्वत:पासून वेगळं करू इच्छित नव्हती. पण आता आपण कधीच भेटू शकणार नाही,’ असे रियाने लिहिले आहे.
रिया लिहिते...
मी तुला विसरू शकलेले नाही. तू मला प्रेमावर विश्वास करायला शिकवले. तुझ्यामुळे मला गणित हा विषय सोपा वाटू लागला होता. तू मला रोज नव्या गोष्टी शिकवायचाय. मी तुला कधीच वेगळं करू इच्छित नव्हती. पण आता आपण कधीच भेटू शकणार नाही. मला माहितीये, तू जिथे आहेस तिथे आनंदी आहेत. निश्चितपणे आकाशातील ताºयांनी, चंद्राने, आकाशगंगेने तुझे मनापासून स्वागत केले असेल. तू माझ्यावर किती प्रेम केलेस, हे मी शब्दांत सांगूू शकत नाही. तू माझ्यावर मुक्तपणे प्रेमाचा वर्षाव केला. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, यासाठी मी प्रार्थना करेल. तू सोडून गेलास त्याला आज 30 दिवस झालेत. मी आयुष्यभर तुझ्यावर असेच प्रेम करत राहिल. आपल्या दोघांचे प्रेम असेच जिवंत राहिल आज मी वचन देते, असे रियाने लिहिले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी रिया चक्रवर्तीने तिचा व्हॉटअॅप डिपी बदलला आहे. तिच्या डीपीवर सुशांतचा एका तिचा एक सुंदर फोटो तिने लावला आहे.