सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय कसून करते आहे. सोन चिडिया सिनेमात सुशांतसोबत काम केलेल्या आणि त्याला अभिनयाचे धडे शिकवलेल्या नरेश दिवाकर यांना त्याच्या मृत्यूने धक्का बसला आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, सुशांतसोबत मी बराचकाळ राहिलो आहे. त्याच्यासोबत मी काम केले आहे. मी त्याचा अॅक्टिंग कोच देखील होतो. सुशांतला आत्महत्या करुच शकत नाही, त्याची हत्या झाली आहे.
रियाच्या एंट्रीनंतर बदलल्या गोष्टी
सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तो नॉर्मल राहायचा. तो एक हुशार मुलगा होता, जो विज्ञान्याबाबत बोलायचा. शूटिंग दरम्यान एकदा त्याला राग आला होता तेव्हा त्याने फोन भिंतीला फेकून मारला होता. मात्र तो डिप्रेशनमध्ये कधीच नव्हता. त्यादरम्यान माझे त्याच्याशी बोलणं व्हायचे.
रियाने सुशांतला कुटुंबीयांपासून आणि मित्रांपासून दूर केले होते. नरेश दिवाकर म्हणाले, जेव्हापासून ही नवी गँग(सिद्धार्थ पिठानी, रिया चक्रवर्ती आणि बाकी सगळे) त्याच्यासोबत आले तेव्हापासून माझे त्याच्याशी बोलणं बंद झाले. सुशांत भगवान शंकराचा भक्त होता. मी त्याला अभिनय शिकवत होतो, त्याउलट त्याने मला विज्ञान शिकवलं होतं. पुढे ते म्हणाले, ''दाल में काला नहीं, बल्कि पूरी दाल ही काली है''