Join us

अंतराळवीर बनता बनता राहिला सुशांत सिंग राजपूत! ‘केदारनाथ’पाठोपाठ दुसरा चित्रपटही रखडला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 6:10 AM

सुशांत सिंग राजपूतचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट आधीच निर्माता व दिग्दर्शकाच्या वादात अडकला आहे. आता सुशांतच्या दुस-या चित्रपटावरही संकटाचे ढग ...

सुशांत सिंग राजपूतचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट आधीच निर्माता व दिग्दर्शकाच्या वादात अडकला आहे. आता सुशांतच्या दुस-या चित्रपटावरही संकटाचे ढग जमू पाहताहेत. होय, सुशांतचा ‘चंदा मामा दूर के’ हा चित्रपट तूर्तास लांबणीवर पडला आहे. गतवर्षी या चित्रपटाची घोषणा झाली होती. यात सुशांत एका अंतराळवीराची भूमिका साकारणार होता. या चित्रपटाच्या तयारीसाठी सुशांत नासालाही गेला होता. केवळ इतकेच नाही तर सुशांतने त्याची खोली सुद्धा अंतराळाप्रमाणे सजवली होती. यात खोलीत त्याने एक टेलिस्कोपही लावला होता. पण आता सुशांतचा हा चित्रपट रखडण्याल्याची बातमी आहे.डिएनएने दिलेल्या वृत्तानुसार, विकी रजानी या चित्रपटाचे निर्माता आहेत. निर्मात्यांनी सुशांतसोबत हा चित्रपट प्लान केला तेव्हा त्यांना खर्चाचा अंदाज नव्हता. पण अंदाज काढला असता, त्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. होय, कारण चित्रपटाचा बजेट ६७ कोटींच्या घरात होता. यातून प्रमोशनल कास्ट वगळण्यात आली होती. विकी रजानी यांनी या चित्रपटासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याचेही प्रयत्न केलेत. पण कुणीच या चित्रपटात पैसा लावायला तयार नसल्याचे त्यांना समजून चुकले. शिवाय ६७ कोटींचा खर्च वसूल होणे कठीण असल्याचे त्यांचे स्वत:चे मत झाले. याचमुळे विकी रजानी यांनी या चित्रपटातून हात काढून घेतल्याचे कळतेय. सुशांतसाठी ही बातमी निश्चितपणे धक्कादायक म्हणायला हवी. कारण त्याने या चित्रपटासाठी ब-याच दिवसांपासून तयारी सुरू केली होती. या भूमिकेसाठी तो प्रचंड उत्सूक होता. पण शेवटी पैशासाठी सगळे काही अडून बसले म्हटल्यावर त्याचाही नाईलाज झाला. कारण, सगळ्याचे सोंग आणता येते पण पैशाचे नाही, हेच खरे.काही दिवसांपासून निर्माता आणि दिग्दर्शकातील वादामुळे सुशांतचा ‘केदारनाथ’ हा चित्रपटही रखडला आहे. पाठोपाठ ‘चंदा मामा दूर के’ हा दुसरा चित्रपटही रखडू पाहतो आहे. सुशांत यावर काय प्रतिक्रिया देतो, ते बघूच.ALSO READ : ​सुशांत सिंग राजपूत घेतोय ‘नासा’मध्ये प्रशिक्षण