Join us

एका वर्षांनंतर आले सुशांत सिंग रजपूतच्या मृत्यूचे कारण समोर, या कारणामुळे झाला होता मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 6:06 PM

सुशांतच्या मृत्यूसंबधित अनेक प्रश्न अनुत्तरित राहिली आहेत. पण आता हा गुंता सुटलेला असल्याचे म्हटले जात आहे.

ठळक मुद्दे एम्सच्या फॉरेन्सिक पथकाच्या तपासानुसार निधनाच्यावेळी त्याने मद्याचे सेवन केलेले नव्हते. तसेच त्याच्या शरीरावर कोणत्याही खुणा नाहीत

काही तारखा कधीच विसरता येत नाहीत. बॉलिवूडप्रेमींसाठी 14 जून ही तारीख यापैकीच एक. आजची ही तारीख बॉलिवूडप्रेमींना एक भळभळती जखम देऊन गेली होती. गेल्यावर्षी 14 जूनला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) जगाला अलविदा म्हटले होते. शून्यातून विश्व निर्माण करणारा सुशांत अचानक जग सोडून निघून गेला होता. (Sushant Singh Rajput Death Anniversary) कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणा-या सुशांतने काळासोबत लीड अ‍ॅक्टरपर्यंतचा पल्ला गाठला.

सुशांतच्या मृत्यूसंबधित अनेक प्रश्न अनुत्तरित राहिली आहेत. पण आता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (AIIMS) त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, सुशांतच्या मृत्यूमागील आत्महत्या हेच कारण होते. तसेच त्याने आत्महत्या सकाळी 10.10 ला केली होती. 

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, एम्सच्या फॉरेन्सिक पथकाच्या तपासानुसार निधनाच्यावेळी त्याने मद्याचे सेवन केलेले नव्हते. तसेच त्याच्या शरीरावर कोणत्याही खुणा नाहीत. त्याने निधनाच्या काही मिनिटं आधी डाळींबाचा ज्यूस आणि पाणी प्यायले होते. हा अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे. एम्सच्या वैद्यकीय पथकाने मुंबईत जाऊन त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार रिक्रिएट करून पाहिला. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांची सखोल चौकशी केली असता सुशांतच्या मृत्यूचे कारण हे श्वास गुदमरल्याने म्हणजेच आत्महत्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत