सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला घेऊन रोज नवे खुलासे होतायेत, हे प्रकरण दिवसंदिवस गंभीर बनत चालले आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा सीसीटीव्ही फुटेज होते. मात्र सुरुवातपासून मुंबई पोलिसांचे हे सांगितले होते की 13 आणि 14 जूनला सुशांतच्या घरातील आणि सोसायटीमधील कोणतचे सीसीटीव्ही काम करत नव्हते. सुशांतसिंग राजपूत यांच्या वांद्रे अपार्टमेंटमध्ये कॅम्पसच्या बर्याच भागात सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. त्याच्या अपार्टमेंटमध्ये जवळपास 14 ते 15 कॅमेरा आहेत. मात्र पोलिसांच्या माहितीनुसार घरातील कोणताच सीसीटीव्ही कॅमेरा काम करत नव्हता आणि अपार्टमेंटमधील देखील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होते.
फिल्मीबिटच्या रिपोर्टनुसार एक मुलाखती दरम्यान सीसीटीव्ही कंपनीच्या मालकाने सांगितले आहे की, त्या दिवशी सुशांतच्या घरातले सगळे सीसीटीव्ही कॅमेरा काम करत होते आणि सगळ्या गोष्टी रेकॉर्डसुद्धा झाल्या आहेत. मात्र मुंबई पोलीस या प्रकरणात काही तरी लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रिपोर्टनुसार बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे सुशांतच्या घरातील बाहेरचे फुटेज मागितले होते आणि मुंबई पोलिसांनी त्यांना ते नाही दिले. त्यामुळे अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न विचारला जातो आहे.