Join us

Sushant Singh Rajput Death Case: ईडीने केला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 4:27 PM

ईडीच्या तपासात एक मोठा रिपोर्ट समोर आला आहे.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. याचदरम्यान ईडीचा एक मोठा रिपोर्ट समोर आला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार सुशांतच्या अकाऊंटमधून मोठी अमाऊंट काढण्यात आल्याचे ईडीला कळले आहे. सुशांतच्या अकाऊंटमधून 60 लाख रुपये काढण्यात आले. ही रक्कम कोणी काढली याचा ईडी तपास करते आहे. एटीएम आमि सेल्फ चेकद्वारे ही रोकड काढून घेण्यात आल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास पाटणा पोलिसांऐवजी मुंबई पोलिसांकडून करण्यात यावा, अशी याचिका सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केली होती. त्यावर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल न्यायालयानं आज सुनावला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा आणि मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं, असं न्यायालयानं निकालात म्हटलं.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र सरकारनं सहकार्य करावं. भविष्यात सर्वोच्च न्यायालयानं सुशांतशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास आपल्या हाती घ्यावा, अशी सूचना न्यायालयानं केली. 'सीबीआय केवळ पाटण्यातील एफआयआरचा तपास करण्यासच सक्षम नाही, तर या प्रकरणाशी संबंधित आणखी गुन्हे दाखल झाल्यास त्यांचा तपासदेखील सीबीआय करेल,' असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभाग