Join us

सुशांतचे पाय होते तुटलेले तर गळ्याभोवती सुईच्या खुणा, हॉस्पिटलमधील स्टाफचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 3:56 PM

हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्यांने धक्कादायक खुलासा केला आहे

सुशांत सिंग राजपूतचे निधन होऊन जवळपास अडीच महिने झाले आहेत. अभिनेत्याचे कुटुंबिय, चाहते, मित्र सर्वजण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सीबीआयच्या चौकशीनंतर या प्रकरणात अनेक ट्विस्ट्स रोज येतायेत. सुशांतच्या निधनानंतर मुंबई पोलीस म्हणाले त्याने आत्महत्या केली पण कुपर हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्यांने धक्कादायक खुलासा केला आहे. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार हा तोच कर्मचारी आहे जो सुशांतच्या निधननानंतर त्याची बॉडी पोस्टमार्ट ते स्मशान भूमीपर्यंत घेऊन गेला होता. त्या व्यक्तीने असा दावा आहे की, सुशांतला ठार मारण्यात आले आहे.

सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात त्या कर्मचाऱ्यांना दावा केला आहे की, सुशांतला ठार मारण्यात आले.  एका खासगी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीची क्लिप श्वेताने शेअर केली आहे, ज्यात त्या व्यक्तीने सुशांतच्या मृतदेहाबद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत.

व्हिडीओत हा कर्मचारी म्हणतोय, आम्हाला फक्त हे माहित होते की हा खून आहे. हा खूनच होता  ज्या खुणा होत्या सुईच्या होते.15 ते 20 गळ्याभवती खुणा होत्या आणि गळ्याभोवती सेलोटेप चिटकलेली होती. या कर्मचाऱ्यांना दावा केला की हॉस्पिटलमधील मोठे मोठे डॉक्टरांचे देखील म्हणणे होते की हा खून आहे.  

 ईडी, सीबीआय आणि एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत आणि रियाची देखील कसून चौकशी केली जात आहे. मात्र, रिया तपास अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देत नसल्याने सीबीआय रियासह अन्य आरोपींची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची शक्यता आहे. रियाची पॉलिग्राफ टेस्ट करण्याबाबत जोरदार चर्चा देखील सुरू आहे. काल सीबीआयने रियाची जवळपास 10 तास चौकशी केली, अनेक प्रश्न विचारले. मात्र, रिया खरं बोलते की खोटं याची तपासणी करण्यासाठी पॉलिग्राफ टेस्ट केली जाऊ शकते. 

पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय? पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे खोटं पकडण्याची चाचणी, ही विज्ञानात लावण्यात आलेल्या अनेक रंजक शोधांपैकी एक टेस्ट. यात एखादा माणूस खोटं बोलत असला की त्याच्या शारीरिक क्रियांमध्ये किंचित बदल होतात, हेच बदल टिपून तो खरं बोलतोय की खोटं हे ठरवलं जातं.

रिया चक्रवर्तीच्या दाव्याची सॅम्युअलकडून पोलखोल, म्हणाला - त्याला कधीच औषध घेताना पाहिलं नाही! 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत