सुशांत सिंह राजपूत केसमध्ये एक नवीन अपडेट समोर आली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटींग समोर आलं आहे. या दोघांमध्ये झालेल्या संवादावरून हे कुठेतरी स्पष्ट होतंय की, रियाने स्वत: सुशांतसोबतचं नातं तोडलं होतं. तसेच रिया आणि महेश भट्ट यांच्यातील चॅटींग याकडेही इशारा करतं की, रिया चौकशीत पोलिसांना सगळं काही स्पष्ट सांगत नाहीये. अशीही चर्चा आहे की, रिया पोलिसांसोबत खोटं बोलत आहे.
रिया चक्रवर्ती हे आधीपासून सांगत आलीये की, सुशांत हा डिप्रेशनमध्ये होता. सुशांतमुळेच ती तणावात होती. तिला सुशांतला सोडायचं होतं. सुशांतच्या सांगण्यावरूनच ती त्याला सोडून गेली. त्यासोबतच रियाने सुशांतच्या बहिणीवरही गंभीर आरोप लावले. पण महेश भट्टसोबत तिने केलेलं चॅटींग काहीतरी वेगळंच सांगत आहे.
८ जून रोजी सुशांतचं घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांना मेसेज केला होता की, 'आयशा पुढे निघाली आहे सर, जड मन आणि एका शांततेसोबत. तुमच्यासोबत बोलणं झाल्यावर माझे डोळे उघडले गेले. तुम्ही माझे एंजल आहात. तुम्ही तेव्हाही होते आणि आजही आहात'.
एका दुसऱ्या मेसेजमध्ये रियाने लिहिले की, 'तुम्ही मला पुन्हा आझाद केलंय, तुम्ही माझ्या आयुष्यात देवासारखे आहात. तेच महेश भट्ट यांनी उत्तर दिलं की, आता मागे वळून बघू नकोस. तुझ्या वडिलांना माझ्याकडून प्रेम दे. आता ते फार आनंदी होतील'.
सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान वकिल श्याम म्हणाले होते की, रिया चक्रववर्ती सुशांतवर प्रेम करत होती आणि ती त्याच्या मृत्यूनंतर धक्क्यात आहे. सोशल मीडियात रियाला वाईट प्रकारे ट्रोल केलं जातंय. तेच इंडिया टुडेच्या एका मॅगझिनसोबत दिलेल्या मुलाखतीत रियाच्या वकिलांनी सांगितले होते की, 'सुशांत त्याच्या परिवाराला फोन करत होता आणि मुंबईतून बाहेर पडण्याच्या आपल्या निर्णयाबाबत बोलत होता. त्यांना आपल्याजवळ येण्यास सांगत होता. अनेक दिवस फोनवर सुशांत रडल्यानंतर त्याची बहीण मीतू ८ जून २०२० ला त्याच्याकडे येऊन राहण्यास तयार झाली'.
ते म्हणाले होते की, 'याच कारणाने सुशांतने रियाला तिच्या परिवारासोबत राहण्यास सांगितले होते. रिया स्वत: आपल्या चिंतेमुळे आणि तणावामुळे हैराण होती. सुशांतची काळजी घेत तिची स्थिती बिघडली होती. रियालाही तिच्या परिवाराकडे जायचं होतं. पण सुशांतला सोडण्यात ती सहज नव्हती'.
हे पण वाचा :
Video : रिया चक्रवर्ती म्हणाली होती, 'रिलेशनशीपमध्ये एक-दीड वर्षांनंतर लोक एकमेकांना..."