मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातील प्रमुख संशयित, सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्तीभोवती आता ईडी, सीबीआयबरोबरच केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण पथकाने (एसीबी) चौकशीचा फास आवळला आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात तपासादरम्यान रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रियाने सुशांतचे घर सोडण्याआधी एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करून घेतला होता अशी माहिती समोर आली आहे.
सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीने सीबीआय चौकशी दरम्यान हा खुलासा केला आहे. तसेच सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनीही डेटा डिलीट केल्याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ सुशांतला मारण्याचा प्लॅन केला होता असं म्हटलं आहे. सुशांतच्या आत्महत्याप्रकरणात रिया चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठानीचे नाव खूप चर्चेत आहे. सिद्धार्थ पिठानी हा सुशांतच्या फ्लॅट पार्टनर आहे. रिया चक्रवर्ती जोवर सुशांतच्या घरात होती तोवर ती इन्स्टाग्रामवर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. विशेष म्हणजे या फोटो आणि व्हिडीओचे रियाने क्रेडिट सिद्धार्थला दिले आहे.
रिपोर्टनुसार, सिद्धार्थ पिठानीने सीबीआयला दिलेल्या माहितीनुसार, हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करताना सुशांत तिथे उपस्थित होता. मात्र त्याने कोणताही विरोध केला नाही. सिद्धार्थने त्या हार्ड डिस्कमध्ये काय डेटा होता याबाबत माहिती दिली नाही. याआधी रियाने 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले होते, अशी माहिती होती. 8 जून रोजी रात्री रियाने भाऊ शोविक चक्रवर्तीला सुशांतच्या घरी बोलवले होते. त्यानंतर दोघांनी बॅग पॅक करून सुशांतचे घर सोडले.
रियाने डिलीट केलेल्या डेटामध्ये सुशांत आणि तिचे काही खासगी व्हिडीओ किंवा फोटो असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सुशांतचा मित्र आणि दिग्दर्शक संदीप सिंह याचीही चौकशी केली जाणार असल्याचे समजते. 14 ते 16 जूनपर्यंत तो सुशांतचे शव नेणाऱ्या शववाहिका चालकाच्या संपर्कात होता. त्याने त्याला सहा वेळा कॉल केल्याचे समोर आले आहे. आपण शववाहिका चालकाला भाडे देण्यासाठी कॉल केले, असे त्याने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
"सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची खोटारडेपणाची फॅक्ट्री सुरू", भाजपाचा हल्लाबोल
CoronaVirus News : पोस्टमन ठरला व्हायरसचा 'सुपर स्प्रेडर', एकाच गावातील 100 जणांना कोरोनाची लागण
CoronaVirus News : 'या' अवयवांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, पोस्टमॉर्टममधून धडकी भरवणारा खुलासा
माणुसकीला काळीमा! दंड न भरल्याने पंचांनीच केला महिलेवर सामूहिक बलात्कार