Join us

तो 4 वेळा स्मोक करतो...! ड्रग्ज कनेक्शनबद्दल मोठा खुलासा, रिया चक्रवर्ती व शौविकचे चॅट आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 10:15 AM

हे चॅट 15 मार्च 2020 रोजीचे आहे. यामध्ये त्यांनी ‘बड’ नावाच्या अमली पदार्थाचा उल्लेख केला आहे.

ठळक मुद्देरिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी शुक्रवारी (4 सप्टेंबर) एनसीबीने धाड टाकली असून ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास जसजसा समोर जातोय, तसतसे नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाला ड्रग्ज कनेक्शनमुळे वेगळे वळण मिळाले आहे. ड्रग्ज कनेक्शन समोर येताच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) सुद्धा वेगवेगळ्या अँगलने आपला तपास करत आहेत. याचदरम्यान रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचे ड्रग्जविषयीचे चॅट समोर आले आहे.न्यूज 18 लोकमतच्या हाती हे चॅट लागले आहेत. हे चॅट 15 मार्च 2020 रोजीचे आहे. यामध्ये त्यांनी ‘BUD’ नावाच्या अमली पदार्थाचा उल्लेख केला आहे.

BUD म्हणजे काय? बड म्हणजे गांज्याची फुलं. हे एकप्रकारचे ड्रग्ज आहे. मुंबईत याची मोठी मागणी आहे. हे विदेशातून आणले जाते आणि कोकेनपेक्षाही महाग मिळते. रिया-शौविकच्या संवादात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. असे आहे चॅट रिया : तो दिवसातून 4 वेळा स्मोक करतो, म्हणून त्यानुसार प्लॅन करा

शौविक: आणि त्याला बडची गरज आहे का ?रिया : होय, बड देखील शौविक : ठिक आहे आपल्याला 5 ग्रॅम बड मिळू शकते़ एकूण 20 डूब्स. (20 सिगरेट)

हे चॅट रिया व शौविकच्या अडचणी वाढवू शकते़ याप्रकरणी एनसीबीने 2 ड्रग्ज पेडलर्सला अटक केली होती. या दोघांनी रियाचा भाऊ शौविकच्या नावाचा खुलासा केला आहे. शोविकचा अनेक ड्रग्ज पेडलर्सशी संपर्क होता, याचे पुरावे एनसीबीला मिळाले आहेत.

  रिया व सॅम्युल मिरांडाच्या घरी धाडरिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी शुक्रवारी (4 सप्टेंबर) एनसीबीने धाड टाकली असून ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीशी संबंधित लोकांनी म्हटले आहे, की टीमने ज्या आरोपीला अटक केली आहे, त्याच्यासोबत रिया व तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे रिया व तिच्या भावालाही कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत