Join us

सुशांत सिंग राजपूतच्या पैशांचा उपयोग स्वत:साठी करायची रिया चक्रवर्ती, ईडीच्या चौकशीत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 5:01 PM

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती भवतीचा चौकशीचा फास आवळला आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती भवतीचा चौकशीचा फास आवळला आहे. सीबीआय सोबतच ईडी देखील या प्रकरणाचा तपास करत आहे आणि रिया चक्रवर्तीच्या मोबाइल फोनचा क्लोन तयार केला गेला आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार ईडीने PMLA (Prevention of Money Laundering Act) च्या सेक्शन 66 अंतर्गत काम करते आहे. या रिपोर्टनुसार रिया सुशांतचे पैसे पर्सनल कामांसाठी वापरायची. यानंतर ईडीने रियाचे दोनही फोनचे क्लोन तयार केले आहे.  ईडीच्या डॉक्युमेंटमध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे की एक मोठे षडयंत्र रचण्यात येत होते. 

ईडीच्या चौकशीत या डिजिटल डेटाच्या विश्लेषणावरून व्हाट्सएप चॅटच्या माध्यमातून रियाच्या काही लोकांशी सतत संपर्कात असल्याची गोष्टी समोर आली आहे. रियाचे सॅम्युअल मिरांडा, रियाचा भाऊ शौविक, दिपेश सावंत, जया साहा, सिमोन खंबाटा आणि गौरव आर्यासोबत झालेल्या चॅटमधून या गोष्टीचा खुलासा झाला आहे. 

रियाच्या भावासोबत इतरही लोकांवर केसएनसीबीने ड्रग्सचा उल्लेख झाल्यावर चौकशीसाठी केस दाखल केली आहे. रिया विरोधात क्रिमिनल केस दाखल झाली आहे. ज्या लोकांची नावे ईडीच्या एफआयआरमध्ये होते त्यांच्या विरोधात एनसीबीने केस दाखल केली आहे. त्यात रियाच्या भावाचाही समावेश आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती