Join us

अभिनेता नाही तर इंजिनिअर व्हायचे होते सुशांत सिंग राजपूतला, इंजिनिअरिंगच्या परीक्षेत देशात आला होता 7

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 3:31 PM

सुशांत 2003 मध्य दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्याच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सुशांत आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. सुशांत मुळाचा बिहारचा होता. अभ्यासात तो प्रचंड हुशार होता. इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडून त्यांने बॉलिवूडची वाट धरली होती. सुशांत 2003 मध्य दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता.

इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेतल्या परीक्षेत सुशांत संपूर्ण भारतात सातवा आला होता. यानंतर सुशांतने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग (आता दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी) मधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू केला. मात्र इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात त्याने शिक्षण सोडून अभिनय सुरु केला.  सुशांत गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याची माहितीसमोर येते आहे मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अजून समजू शकलेले नाही. 

सुशांत एक लोकप्रिय अभिनेता होता. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुशांतने छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘किस देश में हे मेरा दिल’ ही त्याची पहिली मालिका होती. यानंतर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली आणि या एका संधीने त्याचे आयुष्य बदलले. या मालिकेने सुशांतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर सुशांत बॉलिवूडकडे वळला होता. सुशांतने एम एस धोनी, केदारनाथ, काय पो छे यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले असून तो गेल्या वर्षी नेटफ्लिक्सच्या ड्राईव्ह या चित्रपटात झळकला होता.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत