सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला असताना या प्रकरणाचा तपास करणा-या मुंबई पोलिसांच्या टीममधील एक आयपीएस अधिकारी अभिषेक त्रिमुखे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात आता या प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआय टीमच्या कोरोना चाचणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र सीबीआय टीमने कोरोना चाचणी करावी की नाही, हा निर्णय सीबीआय टीमला स्वत: घ्यायचा आहे. बीएमसीने या मुद्यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सुशांत प्रकरणाच्या निमित्ताने त्रिमुखे अनेकदा दिल्लीवरून मुंबईत आलेल्या सीबीआय टीमच्या संपर्कात आले होते. सुशांत प्रकरणाचा संपूर्ण तपशील त्रिमुखे यांनी सीबीआयला सोपवला होता. सुशांत प्रकरणाचा तपास करणा-यासाठी आलेली सीबीआय टीम त्रिमुखेंच्या अनेकदा संपर्कात आली होती. अशात संबंधित सीबीआय टीमला कोरोना टेस्ट होणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.
बीएमसीला याबाबत विचारणा केली असता, कोरोना टेस्ट करायची की नाही, याचा निर्णय सीबीआय टीमने घ्यावा. आमचे याबाबत काहीही म्हणणे नाही. त्यांना गरजेचे वाटल्यास त्यांनी टेस्ट करावी, अन्यथा नाही. हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल, असे बीएमसीच्या एका बड्या अधिका-ºयाने सांगितले.अलीकडे सुशांत प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना बीएमसीने क्वारंटाईन केले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.