सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने काही क्षणांपूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक केली. रिया आज सलग तिस-या दिवशी चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली होती. आज काही तासांच्या चौकशीनंतर रियाला अटक करण्यात आली. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्यासह 10 लोकांना याप्रकरणी अटक केली आहे. रिया चक्रवर्तीला अटक होताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. रियाच्या अटकेच्या बातमीने सुशांतचे चाहते आनंदात आहेत. सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंग आणि सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड यांनीही या कारवाईनंतर आनंद व्यक्त करत परमेश्वराचे आभार मानले आहेत.
श्वेताची पोस्ट
रियाला अटक होताच सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंग हिने सोशल मीडियावर पोस्ट केली. देव आमच्यासोबत आहे, असे तिने लिहिले. श्वेताच्या पोस्टवर अंकिता लोखंडे हिने लगेच कमेंट केली़ यावर हार्ट इमोजी पोस्ट करत ‘दी’ असे तिने लिहिले.
रियाचा यु-टर्नएनसीबीच्या चौकशीत आधी आपण ड्रग्ज घेत नसल्याचे रियाने म्हटले होते. मात्र तिस-या दिवशी रियाने अचानक रियाने यु-टर्न घेत, आपला जबाब बदलला. मी कधीही ड्रग्ज घेतले नाही, असे म्हणणा-या रियाने ड्रग्ज घेतल्याचे कबुल केले. मात्र सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी विवश केले, असे तिने म्हटले.टाइम्स नाऊने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तानुसार, मंगळवारी चौकशीदरम्याने रियाने गांजाचे सेवन केल्याची कबुली दिली. सुशांतने आग्रह केल्यामुळे कदाचित मी कधी गांजाचे सेवन केले असावे, असे तिने या चौकशीदरम्यान म्हटल्याचे कळते. यापूर्वीच्या जबाबात रियाने ड्रग्ज व गांजाचे कधीही सेवन न केल्याचा दावा केला होता. अगदी आज तकला दिलेल्या मुलाखतीतही तिने ठासून हा दावा केला होता़ मी कधीही ड्रग्ज घेतले नाही़ मी ब्लड टेस्टसाठीही तयार आहे, असे तिने म्हटले होते.सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आला होता. यानंतर या प्रकरणाने अचानक वेगळे वळण घेतले होते. ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांचे कनेक्शन समोर येताच एनसीबी अॅक्टिव्ह मोडमध्ये आली होती. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.
म्हणे, सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली; रिया चक्रवर्तीचा यु-टर्न
10 दिवसांत 10 जणांना अटक
रियाचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा, दीपेशसह 10 आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले. त्यानंतर आता एनसीबीने रियाला सुद्धा अटक केली. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनी विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.