सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करते आहे. सीबीआयने रिया चक्रवर्ती यांच्यासह 6 जणांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार याच दरम्यान सुशांतचा फॅमिली फ्रेंड निलोतपाल मृणालने सुशांतच्या केसमध्ये रिया आणि त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानीला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तो म्हणाला सुशांतच्या फ्लॅटमेटला दरवाजा उघडण्यासाठी प्रतीक्षा का करावी लागली? त्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न का केला नाही ? सुशांतच्या डायरीतील पानं कुठे गायब आहेत ? डायरीवर कोणाचे फिंगरप्रिंट आहेत?
तो असेही म्हणाले की, सुशांतला बरे वाटत नव्हते असे हे लोक म्हणत आहेत, तर त्यांच्या अनुपस्थितीत पैसे कोण काढत होते? पुढे तो म्हणाला, रिया सुशांतला महेश भट्टच्या सल्ल्यानुसार डॉक्टरकडे घेऊन जात होती की आणखी कुणाच्या सल्ल्यावरुन. जर सुशांत पैसे वापरत नव्हता तर त्याच्या अकाऊंटमधून पैसे कोण वापरत होते ज्याप्रमाणे प्रसारमाध्यमांमध्ये सांगितले जाते आहे. गेल्या 1 वर्षापासून जर सुशांतला बरं वाटतं नव्हते तर तो स्वत:वर पैसे खर्च करणार नाही आणि औषधांसाठी 15 कोटी खर्च होणार नाहीत. आता सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे, तेव्हा सत्य समोर येईल.
ईडीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने रियाला तिचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जमा करण्यास सांगितले. यावेळी तिने तिचा एक दुसरा फोन नंबर सांगितला नाही. हा नंबर ती वापरत असूनही तिने त्याबद्दलची माहिती लपवून ठेवली. ईडीला मात्र याची माहिती होती. ईडीने तिच्या दुस-या फोनचे कॉल रेकॉर्ड दाखवले तेव्हा कुठे तिने दुसरे सिम वापरत असल्याची कबुली दिली.