सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. ज्यासाठी सुशांतचे कुटुंबीय आणि त्याचे फॅन्स प्रार्थना करत होते. सुशांतचे कुटुंबीय आणि फॅन्स या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत होते. कोर्टाने आज त्यांच्या बाजूने निर्णय देत. पुढील तपास सीबीआयला करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतच्या कुटुंबीयांकडून एक स्टेमेंट जारी करण्यात आले असून यात सत्याचा विजय असे लिहिण्यात आले आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि सुशांतच्या न्यायासाठीच्या लढ्यात उभे राहिलेले अनेकांचे आभार मानले आहेत.
सुशांतचे कौटुंबिक मित्र, हितचिंतक, मीडिया आणि जगभरातील कोट्यावधी चाहत्यांचे मनापासून आभार. सुशांतवर असलेल्या तुमच्या प्रेमाबद्दल आणि आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्ही माननीय मुख्यमंत्री नीतीश कुमार, बिहार सरकार यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी न्याय प्रक्रियेस वेग दिला.
आता देशातील सर्वात विश्वासार्ह तपास यंत्रणेने हा पदभार स्वीकारला आहे त्यामुळे आता आम्हाला विश्वास आहे की दोषींना त्यांच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होईल. या संस्थांवर लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे.आजच्या घडामोडींमुळे लोकशाहीवरील आमचा विश्वास दृढ झाला आहे. आमचे देशावर अतूट प्रेम आहे. आज ते आणखी मजबूत झाले आहे.