Join us

#BoycottKaranJohar सोशल मीडियावर करण जोहरवर चाहते करतायेत बहिष्काराची मागणी, देतायेत संतप्त प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 2:51 PM

आपल्याला सलमान, संजय दत्त सारखे गुंड आवडतात आणि ख-या टॅलेंट नेहमीच डावलले जाते. बॉलिवूडमध्ये नेपोटिझमला बढावा देणारा करण जोहरच आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाने बॉलिवूडला जबरदस्त धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सुशांतच्या निधनाविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटीच त्याच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. अशा सेलिब्रिटींवर चाहते संतप्त प्रतिक्रीया देत आहेत. यात आघाडीवर आहे करण जोहर. ट्विटरवर #BoycottKaranJohar ट्रेंडिंग मध्ये आहे. करण जोहर आणि त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील करत आहे.

आपल्याला सलमान, संजय दत्त सारखे गुंड आवडतात आणि ख-या टॅलेंट नेहमीच डावलले जाते. बॉलिवूडमध्ये नेपोटिझमला बढावा देणारा करण जोहरच आहे. करण जोहर त्याच्या सिनेमात केवळ स्टार किडसना संधी देतो. प्रतिभावान कलाकरांच्या पदरी नेहमीच निराशा पडते अशा प्रतिक्रीया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

सुशांतच्या आत्महत्येनंतर आयुषमानच्या पुस्तकातील एक किस्सा  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाखती दरम्यान सिनेमात काम करायची इच्छा करणजवळ व्यक्त केली होती. तेव्हा करणने त्याचा नंबर आयुष्यमानला दिला होता.

ऑफिसचा नंबर मिळाल्यावर आयुषमान फार आनंदी होता. त्याने धर्मा प्रोडक्शनमध्ये फोन केला. त्यावेळी ऑफिसमधील एका व्यक्तीने करण तेथे नसल्याचे सांगितले.वारंवार फोन केल्यानंतर ''आम्ही फक्त स्टार किड्स सोबत काम करतो आणि तुमच्यासोबत करु शकत नाही असे त्याला सांगण्यात आले होते. आयुषमानने त्याचा हा अनुभव आपल्या पुस्तकात लिहिला आहे. 

टॅग्स :करण जोहरसुशांत सिंग रजपूत