Join us  

सुशांतची आवडती 'रेंज रोव्हर' पाहून चाहते भावूक, कुठे आहे त्याची लक्झरी कार; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 10:40 AM

सुशांतची आवडीची 'रेंज रोव्हर' कार आता कुठे आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput) आज आपल्यात नसला तरी त्याच्या संबंधित सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी चाहत्यांना भावूक करतात. त्याच्या जाण्याने सर्वांना वैयक्तिक धक्काच बसल्यासारखे झाले. आजही त्यांच्यासंबंधित काही फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहते या व्हिडिओला एकदा नाही तर सतत बघतात. सुशांतची आवडीची रेंज रोव्हर (Range Rover) कार आता कुठे आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सुशांतच्या आठवणीत पटना येथील घरीच पार्किंगमध्ये त्याची कार ठेवायची असा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला.

सुशांतला विविध महागड्या गाड्यांची प्रचंड क्रेझ होती. त्याने मेहनतीतून पांढऱ्या रंगाची रेंज रोव्हर खरेदी केली होती. 4747 नंबरची ही लक्झरी कार सध्या त्याच्या गावातल्या घरी पार्किंगमध्ये उभी आहे. तर गाडीसमोरच एका टेबलवर सुशांतचा फोटो ठेवण्यात आला आहे. असं वाटतंय की अभिनेत्याच्या कुटुंबियांनी त्याच्या आठवणीतच कार पार्किंगमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि समोर त्याचा फोटो ठेवलाय. इन्स्टंटबॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

या व्हिडिओवर चाहत्यांच्याही कमेंट्स येत आहेत. चाहते आवडत्या अभिनेत्याच्या आठवणीत पुन्हा भावूक झाले आहेत. तर यासोबतच पुन्हा एकदा #justiceforsushantsinghrajput ट्रेंड होत आहे. 'सुशांत खरा हिरो होता. त्याच्या जाण्यानंतर माझ्यासाठी बॉलिवूडच संपलं' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. 'अजूनही विश्वास बसत नाही की तू आमच्यात नाहीस, तू नेहमीच स्मरणात राहशील' असं म्हणत चाहत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

सुशांतच्या निधनानंतर कशी सावरली अंकिता? पती विकी जैनने पहिल्यांदाच केला खुलासा

१४ जून २०२० रोजी सुशांतसिंग राजपूतने बांद्रा येथील त्याच्या निवासस्थानी गळफास घेत आत्महत्या केली. हे ऐकून त्याच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कोणालाच विश्वास बसत नव्हता की सुशांतने हे पाऊल उचललं. यानंतर सुशांतने आत्महत्या नाही तर त्याची हत्या करण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. याप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची कसून चौकशी करण्यात आली होती.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबिहारकारसोशल मीडिया