बॉलिवूडमध्ये असे खूप कमी लोक असतात जे आपल्याला मिळालेल्या यशाचे श्रेय इतरांना देतात. इतरांनी आपल्यासाठी केलेले काम ते कधीच विसरत नाही. प्रत्येकाच्या आयुष्याच चढ- उतार येतात. त्या क्षणात कोणी आपल्याला साथ देत आधार देणारे खूप कमी असतात त्यापैकीच एक होता सुशांत. त्याच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकार त्याच्याविषयीच्या खास गोष्टी शेअर करत त्याच्या आठवणींना ऊजाळा देत आहेत.
अभिनेत्री वाणी कपूरनेही सुशांतसह सबंधीत एक किस्सा शेअर केला होता. वाणी कपूरने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली आहे. अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवासही सोपा नव्हता. 'शुद्ध देसी प्रणय' हा तिचा पहिला सिनेमा होता. 2013 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे सिनेमात हिरो हा सुशांत होता. त्याच्यासह काम केल्यामुळे जवळून अगदी त्याला ओळखता आले. त्यामुळे सुशांतच्या निधनानंतर वाणी कपूरलाही जबर धक्का बसला होता.
शूटिंग वेळी सुशांत आणि वाणीची चांगलीच गट्टी जमली होती. सुशांतसह पहिला सिनेमा तिने केला होता. यश राजच्या ऑफिसमध्ये सुशांतला पहिल्यांदा भेटले होते. मी तिथे कोणालाही ओळखत नव्हते. पण जेव्हा ऑफिसमध्ये एंट्री केली तेव्हा सुशांतने हस-या चेह-याने माझे स्वागत केले. सुशांतसह झालेली पहिली भेट कधीच विसरू शकणार नाही. जिथे मी कोणालाच ओळखत नव्हते अशा वेळी सुशांतमुळे मी कंम्फर्टेबल झाले. सुशांत अत्यंत चांगला होता नेहमी तो मदतीसाठी तप्तर असायचा. नेहमीच त्याने मला मदत केली. एक प्रतिभावाण कलाकार होता सुशांत. त्याचा शेवटचा 'दिल बेचार' सिनेमा पाहतानाही मला राहून राहून वाटायचे हा याहून खूप हुशार आहे. त्याच्यात खूप टॅलेंट आहे. आजही सुशांतची आठवण करुन खूप दुःखी होते असे काय घडले असावे याच गोष्टीचा विचार करून मन सुन्न होते.
सुशांतमुळेच घडत गेले असे वाणीनेही म्हटले होते. तिला करिअरमध्ये मिळालेल्या यशाचे श्रेय स्वतःपुरतेच मर्यादित न ठेवता सुशांतलाही दिले. वाणी कपूरला बॉलिवूडमध्ये हवे तसे यश अजुनही मिळालेले नाही. तिच्या करिअरमध्ये तिने फक्त चार सिनेमे केले आहेत.आगामी काळात वाणी दोन बड्या सिनेमात झळकणार आहे. 'शमशेरा' आणि अक्षय कुमारचा 'बेल वॉटम' या दोन्ही सिनेमात वेगळ्याच अंदाजात रसिकांच्या भेटीला येणार आहे.