Join us

शेवटचे वडिलांशी फोनवर बोलताना सुशांत सिंग राजपूतने व्यक्त केली होती ही चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 1:27 PM

सुशांत सिंग राजपूतचे वडील पाटणा येथे एकटेच राहतात. मुलाच्या निधनाचे वृत्त समजल्यापासून ते कोलमडून गेले आहेत.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तो गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता, असे समजते आहे. मात्र त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील कोलमडून पडले आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाचे वृत्त समजताच त्याचे वडील कृष्ण कुमार सिंग कोलमडून गेले आहेत. सुशांत वडिलांपासून दूर असल्यामुळे त्याला नेहमीच त्यांची काळजी वाटत होती. तीन दिवसांपूर्वी सुशांतने वडिलांना शेवटचा फोन केला होता. यावेळी त्याने वडिलांना कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता.

सुशांतचे वडील पाटणामध्ये एकटेच राहतात. त्यांची काळजी घेण्यासाठी घरात केअरटेकर आहे. ज्यांचे नाव लक्ष्मी आहे. शेवटचे वडिलांशी बोलल्यानंतर सुशांतने लक्ष्मी यांच्यासोबतही बातचीत केली होती. त्यावेळी सुशांत त्यांना म्हणाला होता की, प्लीज माझ्या वडिलांचा कोरोनापासून बचाव करा.

 याबद्दल लक्ष्मी यांनी सांगितले की, रविवारी जेव्हा सुशांतचे वडील दुपारचे जेवण करत होते तेव्हा मुंबईहून त्यांना कॉल आला. हा कॉल मुंबई पोलिसांचा होता. त्यांनी सांगितले की, सुशांतने घरात आत्महत्या केली आहे. सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांना चक्कर आली होती. मग, त्यांचे मित्र व शेजाऱ्यांनी त्यांना सांभाळले.

तिने पुढे सांगितले की, सुशांत मला दीदी असे संबोधायचा. तो दररोज वडिलांशी बोलत होता. दोन दिवसांपूर्वी माझ्याशी बोलला. म्हणाला होता की पापा आणि तुम्ही कोरोना पासून स्वतःचा बचाव करा. तसेच तो काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की, यावेळी पाटणाला येऊन वडिलांना घेऊन जाईन. त्यांना डोंगरावर फिरायला नेईन. पण तो आला नाही, त्याजागी ही वाईट बातमी आली.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत