सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये दररोज नवीन खुलासे होत आहेत. सीबीआय त्यांचा तपास करत आहेच, पण सोबतच सुशांतशी संबंधित लोक वेगवेगळे दावे करत आहेत. आता दिवंगत अभिनेत्याच्या जवळच्या मित्राने खुलासा केला आहे की सुशांतने 'दिल बेचारा' फिल्मसाठी अर्ध मानधन दिले होते. यामागचे कारण देखील सुशांतच्या मित्राने सांगितले आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सुशांत एका सिनेमासाठी 6 ते 8 कोटी घ्यायचा. पण 'दिल बेचारा'साठी सुशांतने कमी मानधन घेतले होते. यासिनेमासाठी सुशांतने फक्त 3 कोटी रुपये घेतले होते. हा मुकेश छाबडाने दिग्दर्शन केलेले पहिला सिनेमा होता. सुशांत आणि मुकेश छाबडा यांच्यात चांगली मैत्री होती. सुशांतने मुकेशला वचन दिले होते की, त्याच्या पहिल्या सिनेमात मी काम करेन.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूचे रहस्य दिवसेंदिवस आणखी गडद होत असताना सीबीआयने नियुक्त केलेले एम्सचे फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. सुधीर गुप्ता यांनी प्राथमिकदृष्ट्या या पोस्टमार्टम रिपोर्टमधील काही ठळक त्रूटींवर नेमके बोट ठेवले आहे. सीबीआयने पोस्टमार्टम रिपोर्टची फेरतपासणी करण्यासाठी एम्सच्या चार डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. डॉ. सुधीर गुप्ता या टीमचे नेतृत्व करत आहेत. ही टीम सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर आपले मत देतील. सुशांतच्या पोस्टमार्टमवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या मृतदेहाच्या छायाचित्रांबाबतही सीबीआय टीम समाधानी नाही.