Join us

"तो बदला घेण्यासाठी परतलाय.."; सुशांत सिंह राजपूतसारखा हुबेहुब चेहरा पाहून राखी सावंत हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 10:14 AM

राखी सावंत ही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त विधानांसाठी चर्चेत असते. जेव्हा सुशांत सिंह राजपूतचं निधन झाले तेव्हापासून राखी सावंत बऱ्याचदा त्याची बाजू घेत त्याला न्याय देण्याची मागणी करतेय

मुंबई – २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने सिनेइंडस्ट्रीत खळबळ माजली होती. वांद्र्यातील राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता. सुशांतच्या मृत्यूला ३ वर्ष उलटली तरी चाहत्यांच्या मनात तो अजूनही जिवंत आहे. सुशांतचे चाहते सोशल मीडियावर नेहमी ट्रेंडमध्ये असतात. दिवंगत अभिनेता सुशांतने टेलिव्हिजनपासून सुरुवात करून बॉलिवूडपर्यंत मजल मारली होती. एकापेक्षा एक हिट सिनेमा त्याने दिले होते. आता सुशांत सिंह राजपूतसारखा हुबेहुब चेहरा असलेल्या युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा चेहरा पाहून अभिनेत्री राखी सावंतही हैराण झाली आहे.

राखी सावंत ही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त विधानांसाठी चर्चेत असते. जेव्हा सुशांत सिंह राजपूतचं निधन झाले तेव्हापासून राखी सावंत बऱ्याचदा त्याची बाजू घेत त्याला न्याय देण्याची मागणी करतेय. अलीकडेच सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर सुशांत सिंह राजपूतसारखा चेहरा असणाऱ्या युवकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर फॅन्ससह अभिनेत्री राखी सावंतही रिएक्ट झाली आहे. सुशांतचा डुप्लिकेट असणाऱ्या या युवकाचे नाव डोनिम अयान असे आहे.

डोनिमचा चेहरा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याशी मिळताजुळता आहे. डोनिमचे व्हिडिओ पाहून अनेकांना सुशांतला पाहत असल्याचा भास होतो. सुशांत सिंह राजपूतसारखा अगदी हुबेहुब चेहरा असल्याने अनेकांना विश्वासही बसत नाही. इन्स्टाग्रामवर विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडिओवर राखी सावंत म्हणते की, “तो बदला घेण्यासाठी परत आलाय, कर्म!” या व्हिडिओवर राखीसह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

काय घडलं होतं?

३ वर्षापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह राहत्या घरी आढळला होता. घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. मात्र त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झालीय अशी चर्चा सर्वत्र पसरली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला परंतु अद्यापही या प्रकरणी ठोस काही हाती लागले नाही. अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, . सुरुवातीला या प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे नव्हते. उपलब्ध माहिती ऐकीव माहितीवर आधारित होती, नंतर काही लोकांनी ठामपणे सांगितलं की त्यांच्याकडे खटल्याच्या संदर्भात ठोस पुरावे आहेत. त्यानंतर त्या लोकांशी संपर्क साधण्यात आला आणि पोलिसांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले. सादर केलेल्या पुराव्यांची विश्वासार्हता अधिकारी तपासत आहेत. ते पुरावे विश्वासार्ह असतील तर त्याच्या आधारे नक्कीच कारवाई केली जाईल. मात्र सध्या मी या प्रकरणावर कोणतंही भाष्य करणे घाईचे ठरेल, योग्य वेळ आल्यावर मी त्यासंदर्भात बोलेन असं त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :राखी सावंतसुशांत सिंग रजपूत